Just another WordPress site

Delhi : दिल्लीत खळबळ! गाझीपूरच्या मार्केटमध्ये सापडली IED स्फोटकांनी भरलेली बॅग


नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या. दिल्लीच्या गाझीपूर येथील फुलांच्या मार्केटमध्ये पोलिसांना एका बेवारस बॅगमध्ये IED स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, स्पेशल सेल. दहशवाद विरोधी पथक, बॉम्ब नाशक पथक यांच्यासह अन्य सुरक्षा यंत्रणा  घटनास्थळी झाल्या. दरम्यान, संबंधित स्फोटकं गाझीपूर येथील मार्केटमध्ये कसे आले, ते कोणी आणले? याचा शोध लावण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी एक पीसीआर कॉल आला होता. या फोनवर या स्फोटकांविषयी हिंट देण्यात आली होती. गाझीपूर परिसरात एक संशयित बॅग आहे, त्यामध्ये बॉम्ब आहे, असं त्या फोन कॉलवर सांगण्यात आलं होतं. या फोननंतर तातडीने पोलीस आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर  बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. सर्व सुरक्षा यंत्रणांनी तपास केला तेव्हा बॅगेत आयईडी स्फोटकं असल्याची माहिती समोर आली. घटनेचे गांभीर्य पाहून जेसीबी मागवण्यात आला. त्यानंतर एक मोठा खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात स्फोटकं निष्क्रिय करण्याचं करण्यात आलं. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर बॉम्ब नाशक पथकाला स्फोटकं निकामी करण्यात यश आलं. पथकाकडून आयईडीचे नमुने गोळा करण्यात आले असून या स्फोटकात कोणकोणते रासायनिक पदार्थ टाकण्यात आले आहेत, याबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. या स्फोटकांमागे नेमकं कुणाचा हात आहे, ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, पोलीस लवकरच आरोपींना शोधून काढतील अशी आशा व्यक्त केली जाते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!