Just another WordPress site

मोबाईच्या स्फोटात ८ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू, मोबाईलचा ब्लास्ट टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

मोबाईल फोनचा वापर जितका सोयीचा आहे, तितकाच घातकही आहे. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशात मोबाईलचा अचानक स्फोट झाला होता. तर आता पुन्हा एकदा मोबाइलचा स्फोट झाल्याने ८ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. बॅटरी ओव्हरलोड हीट झाल्यानं हा स्पोट झाल्याचं निष्पन्न झालं. मोबाईल वापरताना काळजी न घेतल्यास, ते जीवावर बेतू शकते हे या घटनेतून समोर येतं. दरम्यान, मोबाईल वापरताना कोणती काळजी घ्यावी? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. अलीकडे मोबाईल ब्लास्टच्या घटना वाढल्या
२. मोबाईलचा वापर जितका सोयीचा, तेवढा घातक
३. मोबाईलचा स्फोट झाल्याने ८ महिन्याच्या मुलीचा मृत्यू
४. ब्लास्ट टाळण्यासाठी जास्त वेळ चार्जिंग करू नका

 

खरंतर जेवताना, चालताना, टीव्ही पाहताना, अगदी वॉशरूमला जातानाही लोक मोबाईल सोबत घेऊन जातात. एवढचं नाही तर अनेकजन मोबाईल उशीखाली ठेवून झोपतात. ही काही एक-दोन दिवसांची गोष्ट नाही, तर रोजचीच सवय झाली आहे. मात्र, ही सवय आपल्याला चांगलीच महागात पडू शकतं. कारणं, मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून झोपणं ही अनेकांची सवय आहे. मात्र रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणं अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रकारामुळे अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. या स्फोटाने कित्येकांचे जीव गेलेत.
मोबाईल किंवा स्मार्टफोनच्या स्पोटाची अनेक कारण आहेत. बहुतेक मोबाईल फोन्सचा स्फोट बॅटरीमुळे होतो. बॅटरीचा स्फोट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उष्णता. आता तुम्ही विचार करत असाल की बॅटरी गरम होण्याचा संबंध हवामानाशी आहे. तर तसे बिल्कुल नाही. वास्तविक, जर कोणत्याही कारणाने बॅटरीचे तापमान वाढले आणि बॅटरी खूप गरम झाली, तर फोनचा स्फोट होण्याची शक्यता असते.
शॉर्ट सर्किटमुळेही मोबाईलचा स्फोट होतो. याशिवाय, प्रोसेसरमुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
हल्ली बहुतेक मोबाईलमध्ये हाय-एंड प्रोसेसर असतात, जे जास्त गरम होतात. प्रोसेसर बॅटरीजवळ लावलेले असते, जेव्हा फोनवर जास्त लोड येतो तेव्हा प्रोसेसर गरम होते. प्रोसेसर बॅटरीलाही गरम करतो, त्यानंतर मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. मोबाईलच्या स्पोटाचं आणखी एक कारण म्हणजे, बहुतेक युजर्स मूळ Third party चार्जरने फोन चार्जर वापरतात. थर्ड-पार्टी चार्जर्समध्ये अनेकदा हँडसेटला आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांचा अभाव असतो. त्यामुळंही तुमच्या फोनची बॅटरीही फुटू शकते. याशिवाय, मल्टी-टास्किंग अॅप्स आणि स्मार्टफोनमध्ये PUBG सारखे हेवी गेम खेळल्यामुळे, प्रोसेसर ओव्हरलोड होतो, ज्यामुळे फोनची बॅटरी गरम होते. आणि मोबाईलचा स्पोट होतो. तसंच मोबाईलची बॅटरी ड्युप्लिकेट असेल, तर मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते.

 

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला मोबाईलचा स्फोट टाळायचा असेल तर सर्वप्रथम बॅटरीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मोबाईलची बॅटरी मोठी झाली असेल, तर समजा मोबाईलची बॅटरी ब्लास्ट होऊ शकते. अशा वेळी मोबाईल दूर ठेवा. फोन सूर्यप्रकाशात ठेवू नका. त्यामुळे फोनची बॅटरी गरम होते. याशिवाय फोन जास्त वेळ चार्जिंगवर ठेवू नका. असे केल्याने फोनची बॅटरी गरम होते आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते. महत्वाचं म्हणजे, मोबाईलची बॅटरी कायम ओरिजिनलच वापरावी. पॉवरबँक ऑनलाईन स्वस्त किमतीत मिळतात, मात्र त्या विकत घेणं टाळावं, आणि विश्वसनीय कंपन्यांची पॉवरबँकच विकत घ्यावी. मोबाईल नेहमी त्या त्या कंपनीच्याच चार्जरने चार्ज करा. अन्य चार्जर वापरल्यामुळे तुमचा फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो. मोबाईल चार्जिंग करता करता फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करुनही बोलू नका. ते अत्यंत धोकादायक आहे. शिवाय चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणंही टाळा. चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल गरम होत असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीला नुकसान होऊ शकतं. आवश्यकता नसेल तेव्हा मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवा.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!