Just another WordPress site

Corona Virus Test : कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती टेस्ट करणं योग्य?

गेल्या काही दिवसांपासून देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसनं मोठा धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात तर दिवसागणिक कोरोनाचे ५० ते ६० हजार नवीन रुग्ण आढळून येताहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानं पुर्वीपेक्षा आता रुग्णसंख्या जास्त वाढतेय. त्यामुळे सध्याच्या काळात प्रत्येकानं स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाची काही लक्षणं जाणवू लागल्यास आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि कोरोनाची चाचणी करणं गरजेचं झालं. मात्र कोरोना चाचणीबाबत आजही अनेकांच्या मनात काही गैरसमज आहे. महत्वाचं म्हणजे कोरोना टेस्ट करायची असल्यास कोणती टेस्ट करावी? कोरोनाच्या कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात हे आजही अनेकांना माहिती नाही. कोरोनाची लक्षण आढळल्यास तुम्ही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करु शकता. सरकारी रुग्णालयात गेल्यास मोफत तपासणी केली जाते. तर, खासगी रुग्णालयात गेल्यास तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पाहूयात कोरोनाच्या कोणकोणत्या टेस्ट आपल्याला करता येतील.




हाईलाईट्स

१. कोरोनाची भीती न बाळगता करा कोरोना टेस्ट

२. अनेकांनी दिलं आरटी पीसीआर टेस्टला प्राधान्य

३. कोरोनाची लक्षणं दिसल्यासं वेळीच सावध व्हा

४. सरकारी रूग्णालयात कोरोना चाचणी मोफत

अँटीबॉडी टेस्ट किट काय आहे?



अँटीबॉडी टेस्ट करून तुम्हाला कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी तुमच्या शरीरातील किती  अँटीबॉडी आहेत हे तपासता येतं. या चाचणीसाठी  व्यक्तीचं रक्त तपासणीसाठी घेतलं जातं आणि साधारण अर्ध्या तासात या चाचणीचा रिपोर्ट मिळू शकतो. याला टेस्टला ICMR नं मान्यता दिलेली आहे. 


अँटीजन टेस्ट किट काय आहे?

अँटीजन टेस्ट या चाचणीमध्ये व्यक्तीच्या नाक आणि घसा यामधून तपासणीसाठी काही सॅम्पल घेतले जातात. 



यात विषाणूवर असलेल्या एका खास प्रोटीनचा थर किती आहेय हे लक्षात येतं.  या टेस्टचा रिपोर्ट मिळण्यासाठी २४ तासांचा अवधी लागतो. या टेस्टला देखील ICMR नं याला परवानगी दिलेली आहे.


आरटी पीसीआर टेस्ट कशी केली जातेय?

आरटी पीसीआर टेस्टमध्ये व्यक्तीच्या डीएनए आणि आरएनए ची चाचणी केली जाते. कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याची ही उत्तम पद्धत असल्याचं सांगितल्या जात असून अनेकांनी आरटी पीसीआर या टेस्टला प्राधान्य दिलंय. मात्र, काही वेळा यात चुकीचा रिपोर्ट येण्याचीही शक्यता असू शकते.


कोरोना चाचणी नेमकी कधी करावी?

जर तुम्हाला अशक्तपणा, ताप, अंगदुखी, चव न लागणं, वास न येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, डोकेदुखी, डोळे लाल होणं आणि जुलाब होणं या सारखा त्रास जाणवू लागल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. कोरोना चाचणी केल्यानं नेमकं निदान करून आपल्याला उपचार घेता येतील.

अनेकजण आपण कोव्हीड पॉसिटिव्ह येऊ या भीतिनं टेस्ट न करता त्याकडं दुर्लक्ष करताहेत. आणि त्यामुळं त्यांच्यापासून अनेकांना कोरोनाची लागण होतेय. कोणतीही भीती न बाळगता वेळीच कोरोनाची टेस्टला प्राधान्य दिलं पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!