Just another WordPress site

नीती आयोगात बंपर भरती, सरकारी नोकरीसाठी लवकर करा अर्ज अर्ज

नीती आयोगामध्ये सरकारी नोकरसाठी इच्छुकांसाठ इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नीती आयोग, भारत सरकारने यंग प्रोफेशनल आणि सल्लागार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, यंग प्रोफेशनल्सच्या २२ पदे आणि सल्लागारांच्या ६ पदांसह एकूण २८ पदांची भरती केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहेत. कराराचा कालावधी सुरुवातीला दोन वर्षांसाठी असेल, जो पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येकी एक वर्षाने वाढविला जाऊ शकतो. म्हणजे एकूण कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त नसावा.

 

कोण करू शकतो अर्ज?

NITI आयोगाच्या जाहिरातीनुसार, यंग प्रोफेशनल पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे विज्ञान / अर्थशास्त्र / सांख्यिकी / ऑपरेशन रिसर्च / सार्वजनिक धोरण / विकास अभ्यास / व्यवसाय प्रशासन / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
बीई/बीटेक/एमबीबीएस/एलएलबी/सीए/आयसीडबल्यूए किंवा बारावी नंतर इतर कोणतीही चार वर्षांची व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय जाहिरात जारी केल्याच्या तारखेनुसार ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वरील शैक्षणिक पात्रतेसह ३ ते ८ वर्षांचा कामाचा अनुभव असलेले तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त वय नसलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

 

कुठे आणि कसा कराल अर्ज ?

नीती आयोगाने जाहिरात केलेल्या यंग प्रोफेशनल आणि कन्सल्टंटच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट niti.gov.in वरील करिअर विभागात दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. आणि आपण ऑनलाइन अर्ज पृष्ठावर जाऊ शकता.
अर्ज भरण्याची प्रक्रिया १३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी त्याची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून जतन करावी.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!