Just another WordPress site

Board of Trustees of Sai Sansthan of Shirdi announced । शिर्डीच्या साई संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर; साई संस्थानवर राष्ट्रवादीचे वर्चस्व


अहमदनगर : देशातील लोकप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी आणि पुर्ण वेळ समिती नेमण्यासाठी कोर्टाने २२ जूनची मुदत निश्चित केली होती. आणखी एका प्रतिष्ठित आणि सुप्रसिध्द सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेक़डे असल्यामुळे, या ट्रस्टचे अध्यक्षपद मिळावे म्हणून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरु होती. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त कुणाची वर्णी लागणार, याबाबत नेहमीप्रमाणेच यावेळीही उत्सुकता होती. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख सत्यजीत तांबे हे ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. अखेर राज्य सरकारने नव्या विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तांची नियुक्ती केली. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली.  

तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, अनुराधा आदिक, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राहुल कनाल, सुहास आहेर आणि अविनाश दंडवते यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आधी राजकीय निर्णय होत नसल्याने आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही नियुक्ती दीर्घकाळ रखडली होती. न्यायालयीन वाद टाळण्यासाठी सरकारने नियमावलीतही दुरूस्ती केली, मात्र त्या दुरूस्तीलाही आव्हान देण्यात आलं असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे. दरम्यान, अपेक्षितपणे यंदाही विश्वस्त मंडळात राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!