Just another WordPress site

Battery Swapping Policy: बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आहे तरी काय आणि कसा फायदा होणार? जाणून घ्या डिटेल्स

तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय बजेट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी स्वॅपिंग नीतीची घोषणा केलीये. या घोषणेमुळे कारची बॅटरी चार्ज करण्याच्या चिंतेतून सुटका होणार आहे. दरम्यान, ही बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आहे तरी काय?, आणि त्याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे? याच विषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणणार

२. डिस्चार्ज बॅटरी चार्ज केलेल्या बॅटरीच्या बदल्यात बदलू शकता

३. कोणत्याही बॅटरी स्वॅपिंग केंद्रावर बॅटरी रिप्लेस करू शकला

४. स्वीडन आणि नेदरलॅण्ड या देशात आहे बॅटरी स्वॅपिंग 

काय आहे बॅटरी स्वॅपिंग? 

बॅटरी स्वॅपिंग द्वारे तुम्ही डिस्चार्ज झालेली बॅटरी पूर्ण चार्ज केलेल्या बॅटरीच्या बदल्यात बदलू शकता. म्हणजे, जसं तुम्ही तुमच्या कारमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाता, तसचं सरकारच्या बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीनंतर तुम्हाला कंपन्यांच्या स्वॅपिंग स्टेशनवर जावे लागेल. तिथं तुम्हाला तुमची जुनी डिस्चार्ज केलेली बॅटरी द्यावी लागेल, ज्याच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण चार्ज केलेली दुसरी बॅटरी मिळेल. स्वॅपिंग स्टेशनवर अनेक ब्रँडच्या बॅटरी उपलब्ध असतील, जिथे अनेक बॅटरी सतत चार्ज केल्या जातील. त्या बदल्यात, तुम्हाला पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीचे बिल भरावे लागेल.


काय आहे हे धोरण?

इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्ही ती बॅटरी बदलू शकता. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, स्वॅपिंग स्टेशनवर चार्ज केलेली बॅटरी तुम्हाला वापरलेल्या बॅटरीच्या जागी रिप्लेस करता येईल. यामुळे गाडीतील बॅटरी या डिटॅचेबल असतील. म्हणजेच तुम्हाला गाडीच्या केवळ बॅटरी विकत घेता येतील. कारण त्या स्पेअरपार्टप्रमाणे उपलब्ध होतील. सध्या अनेक गाड्यांमध्ये या बॅटरी इनबिल्ट येतात. या गाड्या घेताना आता बॅटरीसंदर्भातील कोणताही पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध नाहीय. मात्र नवीन धोरणामुळे आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीची बॅटरी निवडण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 


काय होणार फायदा? 

समजा तुम्ही इलेक्ट्रिक कारने प्रवास करत आहात. आणि तुमच्या वाहनाची बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्ही वाटेत असलेल्या कोणत्याही बॅटरी स्वॅपिंग केंद्रावर बॅटरी रिप्लेस करू शकला.  म्हणजेच, बॅटरी चार्ज करतांना जो तुमचा वेळ जाणार होता, त्याची बचत होईल. कारण सध्या ईव्ही बॅटरीला चार्ज करण्यास कमीत कमी ७ ते १० तास लागतात. तेही वेगवेगळ्या मॉडलवर अवलंबून आहे. अशा वेळेस या धोरणामुळे तुम्हाला बॅटरी स्वॅपिंग करता येईल. दुसरं म्हणजे, चार्जिंग स्टेशनवर गर्दी असेल तर बराच वेळ थांबावे लागू शकते. मात्र, बॅटरी स्वॅपिग पॉलिसीमुळे तुम्ही हा त्रास टाळू शकाल आणि चार्जिंग पासून सुटका मिळू शकते. 


कोणत्या देशात आहे बॅटरी स्वॅपिंग?

स्वीडन, नेदरलॅण्ड आणि नॉर्वेसारख्या देशामध्ये मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या आहेत. त्यामुळे या देशांमध्ये आधीपासून बॅटऱ्यांसंदर्भातील हे धोरण लागू करण्यात आलंय. याला बॅटरी इज अ सर्व्हिस मॉडेल असंही म्हटलं जातं.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!