Just another WordPress site

‘बाळासाहेब ठाकरे ऐवजी मोदी, शहा यांच्या नावाने चिन्ह मागा’; अमोल मिटकरींचा शिंदे गटाला टोला

बारामती : शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गट ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला. आमदार अमोल मिटकरी आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.

जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसेनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जिंकणार

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवले असले तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेतही भगवा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!