Just another WordPress site

Asembly Election । विधान परिषद निवडणूकीत मतदारांचा भाजपला कौल; नागपूरमधून बावनकुळे तर अकोल्यात खंडेलवाल विजयी


नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल हाती लागले.  निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया  आणि भाजपचे वसंत खंडेलवाल  यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झालेत. 

अकोल्यात गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय. तर नागपूरमध्ये भाजपचे बावनकुळे विजयी झालेत. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिला. मात्र, देशमुख पराभूत झाले. देशमुख यांचा परावभाने काँग्रेसला मोठा झटका बसलाय. वसंत खंडेलवाल यांना ४४३मते मिळाली आहेत तर गोपिकिशन बजोरिया यांना ३३४ मते मिळाली असून  खंडेलवाल यांनी ही निवडणूक ११० मतांनी जिंकली. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती, तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर  यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं होतं.काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपच्या नियोजनाला यश आलं. बावनकुळे यांना ३६३ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!