Just another WordPress site

Anything For Love । पाकिस्तानच्या तरुणाची भारतीय तरुणीला भेटण्यासाठी घुसखोरी

राजस्थान : पाकिस्तानमधील एक तरुण सोशल मीडियावर मुंबईत राहणाऱ्या एक तरुणीच्या प्रेमात पडला. मात्र ही दोस्ती त्याला चांगलीच महागात पडली. प्रेमात वेड्या झालेल्या या तरुणाने तरुणीला भेटण्यासाठी भारत-पाक सीमेवरील काटेरी कुंपण पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कुंपण पार करत असताना बीएसएफच्या जवानांनी त्याला अटक केली. 


बीएसएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद अहमर असे या तरुणाचे नाव असून पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये राहणारा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  हा तरुण सीमा ओलांडून राजस्थानला आला होता आणि शनिवारी रात्री बीएसएफच्या गस्तीने त्याला पकडले. बीएसएफने सांगितले की, संशयित तरुण भारतीय हद्दीत शक्कल लढवत घुसला. त्याची चौकशी सुरू केली असता तो स्पष्ट काही सांगण्यास टाळाटाळ करत होता. दरम्यान त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि मोबाईल फोन सापडला. प्राथमिक चौकशीमध्ये या तरुणाने सोशल मीडियावरून त्याची मुंबईतील एका तरुणीशी मैत्री झाल्याचे सांगितले. सध्या सीमासुरक्षा दलासह सुरक्षा एजन्सी या पाकिस्तानी तरुणाची सखोल चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!