Just another WordPress site

Akhilesh yadaw : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे किती आहे संपत्ती?

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सोमवारी मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली आणि पत्नी डिंपल यादव यांची संपत्ती, उत्पन्न आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील दिला.  २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव  यांनी या तीन वर्षात किती कमाई केली आणि आता त्यांची संपत्ती किती झाली? याच विषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. अखिलेश-डिंपल ४०.०२ कोटींच्या संपत्तीचे मालक

२. २०१९ च्या लोकसभेच्या तुलनेत तीन कोटींची वाढ 

३. अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादव यांना दिले कर्ज

४. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड


अलीकडेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स कडून राजकीय पक्षांच्या संपत्तीचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला. त्यात प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय. अशातच अखिलेश यादव यांनी उमेदवारी अर्जासोबत  निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातआपल्या संपत्तीचा तपशील दिला. प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत: आणि पत्नीची एकूण ४०.०२ कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती  दाखवली. त्यामुळे अखिलेश यादव हे जंगम आणि स्थावर अशा एकूण ४० कोटींच्या मालमत्तेचे मालक असल्याचे सांगण्यात आले. २०२९ च्या लोकसभेच्या तुलनेत तीन कोटींची वाढ झाली. तर २०१२ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर अखिलेश यादव यांचे वार्षिक उत्पन्न १.२५ कोटी रुपये होते, तर पत्नी डिंपल यादव यांचे वार्षिक उत्पन्न २८.३१ लाख रुपये होते. दरम्यान, आता अखिलेश यांचे उत्पन्न ८३.९८ लाख झाले आहे. तर डिंपल यांचे उत्पन्न ५८.९२ लाख रुपये झाले आहे. अखिलेश यादव यांच्याकडे असलेली एकूण जंगम संपत्ती केवळ ८ कोटी ४३ लाख ७० हजार ६५४ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले. त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्याकडे ४ कोटी ७६ लाख ८४ हजार ९८६ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलगी आदिती यादव यांच्याकडे १० लाख ३९ हजार ४१० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. अशाप्रकारे या तिघांची जंगम मालमत्ता जोडल्यास ही रक्कम १३ कोटी ३० लाख ९५ हजार ४१ रुपयांवर पोहोचते. स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही अखिलेश यादव मागे नाहीत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या तपशीलानुसार, त्यांच्याकडे १७ कोटी २२ लाख ८५८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नी डिंपल यादव यांच्याकडे ९ कोटी ६१ लाख ९८ हजार ९१८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशाप्रकारे या दोघांची एकूण स्थावर मालमत्ता २६ कोटी ८३ लाख ९९ हजार ८८६ रुपये आहे. जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्ता जोडून अखिलेश यादव यांनी त्यांची एकूण ४० कोटी १४ लाख ९४ हजार ८१७ रुपयांची संपत्ती जाहीर केली. याशिवाय, त्यांनी ३२.७४ लाख रुपयांच्या सहा वेगवेगळ्या विमा पॉलिसी घेतल्या आहेत. तर त्यांच्या पत्नी  डिंपल यांनी २५ लाखांचा विमा उतरवला.  तसेच अखिलेश यांनी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांना २.१३ कोटी रुपयांचे कर्ज दिले असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले. मुलायमसिह यांच्याशिवाय अखिलेश यांनी अन्य काही व्यक्तींना आणि संस्थांना सुमारे २८ लाख रुपयांचे कर्ज दिले… अखिलेश यांच्याकडे १.७९  लाख रुपये आणि पत्नी डिंपल यांच्याकडे ३.३२ लाख रुपये रोख आहेत. याशिवाय अखिलेश यांची सात बँक खाती आहेत तर डिंपल यांची११ बँक खाती आहेत. अखिलेश यांच्या बँक खात्यात ५.५६ कोटी रुपये आहेत, तर डिंपल यांच्या खात्यात २.५७ कोटी रुपये आहेत.. दरम्यान, अखिलेश यादव यांनी त्यांचा व्यवसाय म्हणून शेती दाखवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!