Just another WordPress site

सत्तार, राठोड यांच्यानंतर शंभूराज देसाईंच्या अडचणतीत वाढ, आरोप झालेलं नेमकं प्रकरण तरी काय?

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमधील ५ मंत्री हे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटीच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अन्न-औषध मंत्री संजय राठोड, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप होत आहेत. यात विना परवानगी बांधकाम केल्याचा शंभूराज देसाई यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी घोषणा आज सकाळी घोषणाबाजी करत सामंत, सत्तार, राठोड आणि शंभूराज देसाई यांची नावं घेतली.

शंभूराज देसाई यांनी विना परवानगी बांधकाम केले. या बांधकामाचा उल्लेख सातबारावर नाही, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. महाबळेश्वरमधील नावली इथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा देसाई यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यामुळे शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शंभूराज देसाई यांनी आपल्या पाटण मतदारसंघातील शेत जमिनीवर बांधकाम केले आहे. पण सातबारावर या बांधकामाचा कुठेही उल्लेख नाही. शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात येतोय. यासंबंधी जी पुरावे आणि आवश्यक कागदपत्र आहेत, ती विधिमंडळात ठेवण्यात येतील, असा इशारा ठाकरे गटाच्या आमदारांनी दिला आहे.

काय आहेत ठाकरे गटाचे आरोप?

● शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरच्या नावली येथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले
● निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात या जमिनीचा शेत जमीन म्हणून उल्लेख
● प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम
● सातबाराच्या उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही
● सदर जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामाला परवानगी नव्हती
● परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केले
● अवैध बांधकाम केल्यामुळे पद रद्द होण्यास ते पात्र
● सदर जमीन ही शंभूराज देसाई यांच्या नावावर आहे

ठाकरे गटातील नेत्यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. शंभूराज देसाई हे विधानसभेत उत्तर देतील, अशी शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!