Just another WordPress site

उडणाऱ्या बस आणि कारनंतर आता आली उडणारी बाईक; जगातील पहिली उडणाऱ्या बाईकची खासियत काय?

मानवीनिर्मित उडणाऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला कधी कोणी विचारलं तर लहानपणापासून आपल्याला तोंडपाठ असणारं एक नाव म्हणजे विमान आणि दुसरं हेलीकॉप्टर. मात्र कधी उडती दुचाकीही येऊ शकते याचा विचार तुम्ही केलाय का? नाहीये ना. मात्र, आता हा विचार सत्यात उतरलाय. जपानी कंपनी एयरविन्सने उडत्या बाईकचे स्वप्न साकार केले. दरम्यान, याच बाईकविषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. उडणाऱ्या कार, बस नंतर आता आली उडणारी बाईक
२. जपानच्या या उडत्या बाईकला ‘एक्स टुरिस्मो’ असं नाव
३. एक्स टुरिस्मोती किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर एवढी
४. या बाईकला असणार हेलीकॉप्टर सारखं लँडिंग स्टँड

 

हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली बाइक फॅन्टसी आता खरी होतेय. उडणाऱ्या कार, उडणारी बस यापाठोपाठ आता एका उडणाऱ्या बाईकने ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले. अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये त्याचे नुकतेच लॉन्चिंग झाले. जपानच्या या उडत्या बाईकला ‘एक्स टुरिस्मो’ असं नाव देण्यात आले आहे. याला ‘हॉवरबाईक’ असेही म्हणतात. X Turismo या हॉवरबाईकचा एक व्हिडीओ सध्या बाइकप्रेमींचे लक्ष वेधून घेतोय. या हवेत उडणाऱ्या बाईकची पहिली झलक खरोखरच थक्क करणारी आहे. ड्रोनप्रमाणे रचना असणाऱ्या या बाइकचे उच्च-प्रगत सेन्सर्स आणि तंत्रज्ञान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या बाईकची उडण्याची क्षमता ४० मिनीटं आहे. तर या बाईकचा वेग ६२ mph पर्यंत आहे. XTurismo मध्ये गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायब्रिड कावासाकी इंजिन आहे. या बाईकचे वजन सुमारे ६६१ पाउंड म्हणजे, २९९ किलो एवढं आहे. ही जगातील पहिली उडणारी बाईक असून नुकतेच तिचे अमेरिकेत पदार्पण केले. या बाईकची निर्मिती जपानी कंपनीकडून करण्यात आली असून जपानमध्ये तिला विक्रीसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं. २०२३ मध्ये ही बाईक अमेरिकेतही उपलब्ध होण्याची माहिती पुढे येतेय. या उडत्या बाईकची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडण्याच्या पलीकडे आहे. सात लाख सत्त्याहत्तर हजार डॉलर एवढी या बाईकची किंमत आहे. ‘एक्स टुरिस्मो’ बाईकची खासियत म्हणजे तिचा शानदार लुक. याला स्पोर्ट्स बाईकसारखा लूक देण्यात आलाय. पण ड्रायव्हरसाठी ती खूपच आरामदायी आहे. सध्याचे मॉडेल पेट्रोलवर चालणारे आहे. ही उडती दुचाकी साधारण बाईकच्या तुलनेत वेगळी असणार असून हेलीकॉप्टर सारखं लँडिंग स्टँडही असणार आहे. ही बाईक महागडी जरी असली तरी ही आता अनेकांची ड्रिम बाईक ठरणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!