Just another WordPress site

Aditya thakrey । आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक

मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय आरोपीला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळूरू येथून अटक केली. जयसिंग राजपूत असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याने आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप संदेशात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास  आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी ठाकरे यांच्या वतीने  पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळूरू येथून जयसिंग राजपूत याला अटक  केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!