Just another WordPress site

फडणवीसांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य आणि उद्धवजी ठाकरे जेलमध्ये जातील- नवनीत राणा

नागपूर : सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले आहे. याला आता खासदार नवनीत राणा यांनी उत्तर दिलंय. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.

“सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेल मध्ये जातील. तीन वर्षानंतर नागपुरात पहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकारमुळे होत आहे. उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठी कामे सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल,” असं आव्हान खासदार राणा यांनी ठाकरेंना दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व कामे तोंडपाठ आहेत. पण उद्धव ठाकरे यांना एकही प्रस्ताव तोंडपाठ नाही. जनतेला काम हवे आहेत. आरोप-प्रत्यारोपासाठी अधिवेशन नाही, जनतेच्या पैशातून अधिवेशनात खर्च केला जातो. कोणता बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही. खूप सारे विषय आहेत. काम करताना चुका प्रत्येक व्यक्तीकडून होतात. जर ते पकडायला सुरुवात केली तर त्यांना हे जड जाईल, असा इशारा देत देवेंद्र फडणवीस यांना फटाके फोडण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यांना कामात इंटरेस्ट आहे. समृद्धी महामार्ग, वैद्यकीय काम अशी व्हिजन यात दिसत असल्याचे खासदार राणा म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!