Just another WordPress site

Aaditya Thackeray: ठाकरेंना धक्का! आदित्य ठाकरेही मोदी सरकारच्या रडारवर, आदित्य यांच्या कामाची होणार चौकशी

शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला जात असतांनाच आता भाजप-सेना यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचा कारभार केंद्र सरकारच्या रडारवर आला. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या कार्यकाळातील कामांची केंद्र सरकार चौकशी होणार आहे. पुणे कोल्हापूरसह ९  विभागात केंद्राचे ऑडिट होणार असल्यानं  शिवसेना आणि  भाजप यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे.


महत्वाच्या बाबी 

१. राज्य प्रदूषण मंडळाचा कारभार केंद्र सरकारच्या रडावर

२. अडीच वर्षांतील कामकाजाबाबत केंद्राचा मोठा निर्णय

३. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामांचे होणार ऑडीट

४. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता


राज्यातील सत्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार, नगरसेवर आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. अन् राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आणि  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात खडाजंगी सुरू आहे. अशातच शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय अस्तित्त्व आणि पक्ष वाचवण्याची दुहेरी लढाई लढत असलेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. आता भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर आल्याचं चित्र आहे. कारण, आता मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात सांभाळलेल्या पर्यावरण खात्याचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले होते. त्यानंतर आता आदित्य हेही मोदी सरकारच्या रडारवर आल्यानं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोलल्या जातं. खरंतर शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. अशा स्थितीत शिवसेनेला पुन्हा उभारी देणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करून  या पिता-पुत्रांनी शिवसैनिकांच्या बैठकाचा सपाटाच लावलाय होता. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक भागांमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसंवाद यात्रेत नाशिक आणि औरंगाबादमध्ये झालेली आदित्य ठाकरे यांची भाषणं चांगलीच गाजली होती. या सभांमध्ये त्यांनी शिंदे गटातील बंडखोरांवर सडकून टीका केली. त्यांच्या सभा आणि रोड शो ला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता, याचाच धसका भाजपने घेतल्यानं शिवसेना अटकाव करण्यासाठी भाजपकडून जाणीवपुर्वक ही चौकशी केली जात असल्याचं राजकीय सांगतात. दुसरं म्हणजे,  लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या ठिकाणी शिवसेनेचा चांगला जोर आहे.. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा गेल्या काही दशकांपासून भगवा फडकतोय.  ही सत्ता अबाधित ठेवण्यायासाठी शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणी सुरू आहे. आणि सध्या शिवसेनेची जी पडझड  झालीय, त्यातून बाहेर पडण्यासाठी आदित्य ठाकरे करत असलेले प्रयत्न हे निश्चितच सेनेसाठी मोठी संजीवनी ठरण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं आदित्य ठाकरेंच्या खात्याचं ऑडिट करून त्यांना अडचणीत आणणं हा भाजपचा डाव असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे  आता ठाकरे विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष अधिक गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झालंय. मात्र,  आता केंद्र सरकारने या सगळ्याची चौकशी केल्यास त्यामधून काय निष्पन्न होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!