Just another WordPress site

व्हॉटसअ‍ॅपवर आलेला मेसेज तासात २४ तासांत आपोआप डिलीट होणार!

आजच्या या इंटरनेटच्या जमान्यात कुणी मोबाईल वापरत नाही, असा माणूस दिवा, बत्ती, आणि लालटेन शोधून बघितलं तरी शोधला सापडणार नाही. आज अगदी ग्रामीण भागातल्या सर्वसामांन्य माणसाजवळही स्मार्ट फोन असून त्यात   व्हॉटसअ‍ॅप असतं. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग व्हिडिओ कॉलिंग आणि इतरही काही सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सुरूवातीला जे व्हॉट्सअप वापरतांना आपल्याला जेवढं कौतुक वाटतं, पुढे चालून त्याच व्हॉट्सअपचा तुम्हांला कंटाळा येऊ लागतो. गृपवर सतत आढळणारे तेच मॅसेज,  त्यातच मोबाईल हॅंग होणं, मग हे मॅसेज डिलिट करण्यात जाणारा वेळ यामध्ये आपल्याला खूप चिडचिड व्हायला लागतं. तुमच्या सोबतही अशाच काही गोष्टी घडत असतील तर आता अजिबात कंटाळून जाण्याचं काम नाही.  या सर्व गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी व्हॉट्सअपनं एक नवीन फिचर आणलं होतं.हाईलाईट्स

१. व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज 24 तासात डिलिट होणार?

२. लवकरच व्हॉट्सअप आणतंय नवीन फिचर

३. आता गृपवर आलेले मॅसेज डिलिट करण्याची गरज नाही

४. इतरांना पाठवलेले मेसेज २४ तासांत होणार गायब


या नवीन फिचरला इनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेले मॅसेज हे ७  दिवसानंतर आपोआप गायब होत होते. आता यातही कंपनीने काहीशा प्रमाणात बदल केला. या सात दिवसाचा अवधी व्हॉट्सअॅपनं 24 तासांवर आणलाय. म्हणजेच काय की तुम्ही इतरांना पाठवलेले मॅसेज हे आपोआप 24 तासात डिलिट होणार आहेत. व्हाट्सअ‍ॅपच्या या iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग सुरू आहे. या नवीन फिचरमुळं तुम्ही इतरांना पाठवलेले मेसेज हे अवघ्या २४ तासांत गायब होतील. मात्र, यात गंमत आहे की, जो व्यक्ती मेसेज पाठवतो तोच ठरवेल की मेसेज गायब करायचा की नाही. मॅसेज पाठवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं या फिचरला इनेबल केल्यानंतर इतरांना पाठवलेला मेसेज चोवीस तासांत आपोआप डिलिट होईल. सध्या व्हाट्सअ‍ॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचरमध्ये आताही ही सुविधा आहे. मात्र सध्या ही सुविधा सात दिवसांची आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला मॅसेज आला तो कॉपी करून तसंच स्क्रीनशॉटही काढून ठेऊ शकतो. हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी यापुर्वीच जारी करण्यात आलंय. मात्र २४ तासात मॅसेज डिलिट होणाऱ्या या नवीन फिचरवर व्हॉटसअ‍ॅप महिन्याभरापासून काम करत आहे. त्यामुळं लवकरच हे फिचर तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे. त्यामुळं तुम्हींही आता सध्या व्हॉट्सअप वापरत असाल तर या नवीन बदलाला तयार रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!