Just another WordPress site

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या.

गेल्या वर्षभरापासून देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला. कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेेत. तपूर्णत: लॉकडाऊन नसला तरी काही कडक निर्बंध राज्य सरकारकडून लादण्यात आलेत. शिवाय, राज्यात सर्व ठिकाणी नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आलाय. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता राज्य सरकारनं तीस एप्रिल पर्यंत काही कडक निर्बंध लादले असून या दरम्यानच्या काळात शनिवारी रविवारी विकेंड लॉकडाऊन सुरू केलं. शुक्रवार पासून म्हणजेच आज रात्री ८ वाजेपासून या लॉकडाऊनचं  काऊंटडाऊन सुरू होणार आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याबाबत नागरिकांत संभ्रम असून याविषयीच्या नेमक्या काय गाईडलाईन्स राज्य सरकारने जारी केल्यायत….? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.



हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठीचे नियम


– शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार

– शनिवारी आणि रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार

– ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही

– निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार

– १० एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

– RTPCR चाचणी नसल्यास १ हजार रुपयांचा दंड

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?


– ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना प्रवासाची परवानगी असणार

– टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या ५० टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी

– सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास ५०० रुपये दंड

– सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घेणं गरजेचं असणार

– १० एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार  

– रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार

– ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही

– लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई

– सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करणं गरजेचं आहे.



खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?


– खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी आहे.

– मात्र शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही

– केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत परवानगी असणार

– खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं लागणार.

– १० एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक

– ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी १५ दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरले जाणार

– RTPCR चाचणी नसल्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार

कोरोनाला जर हरवायचं असेल तर राज्य सरकारने दिलेल्या सुचनांच पालन करणं गरजेचं आहे. तसंच, नियमित मास्कचा वापर करणं, वारंवार हात धुणं, काम असेल तर घराबाहेर पडणं या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!