Just another WordPress site

धक्कादायक! बेड न मिळाल्यामुळं कोरोना रुग्णाचा गाडीतच मृत्यू; व्हायरल व्हिडीओमुळं खळबळ

गेल्या काही दिवसांपासून देशभरासह राज्यात कोरोनानं व्हायरसनं मोठं थैमानं घातलं. मध्यंतरी ब्रेक घेतलेल्या कोरोनानं मागील एका महिन्यापासून राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हातपाय पसरवण्यास सुरूवात केली.  अहमदगर जिल्ह्यातही कोरोनानं मोठा कहर केला असून जिल्ह्यात दिवसेंदिवस रूग्णाचं प्रमाण वाढतं. नगरमध्ये कोरोनाचे दिवसागणिक जवळपास दोन हजाराच्या नवे रुग्ण आढळून येताहेत.  तर यादरम्यान ४० ते ५० जणांचा मृत्युही होतो. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता १३ हजाराच्याही पुढं गेली. अनेकांना या महामारीत अपुऱ्या आरोग्य सुविधेअभावी आपले प्राण गमवावे लागत असल्यानं आरोग्य व्यवस्थेचा मोठा ताण आलाय. अशातच  श्रीरामपूरहुन उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला शहरात कुठेच बेड उपलब्ध न झाल्यानं या रुग्णाचा गाडीमध्येच दुर्देवी  मृत्यू झाला. आपल्यावर आलेल्या संकटाची माहिती देतांनाचा मृताच्या नातेवाईकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


हाईलाईट्स

१. बेड न मिळाल्यानं रुग्णाचा उपचाराअभावी गाडीतच मृत्यू

२. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा कहर

३. जिल्ह्यात दिवसागणिक ४० ते ५० जणांचा होतो मृत्यू

४. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पार 


रविवारी श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील विक्रम अण्णा गायकवाड यांना श्वसनाचा त्रास होत होता. उपतारासाठी त्यांना नगरला आणण्यात आलं. सुरुवातीला जिल्हा रूग्णालयात बेड उपलब्ध आहे का याची चौकशी केली. मात्र, जिल्हा रुग्णालयाने त्यांना बेड नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिलाय. त्यांना थांबण्यास सांगितलंय. रूग्णांच्या नातेवाईक रुग्णाला घेऊन  इतर रुग्णालयांत गेले, मात्र त्यांना कुठंच बेड मिळाला नाही. अखेर पुन्हा ते माघारी जिल्हा रूग्णालयातच आलेयत. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अखेर बेड शोधण्यासाठी कोरोना रुग्णाला घेऊन फिरत असतानाच या रुग्णांचा गाडीतच दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान, कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही जिल्ह्यात वाढलं असून दिवसाला जवळपास पन्नासीच्या आसपास मृत्यू होतोहेत. नालेगावमधील अमरधाम स्मशानभूमीत रूग्णांच्या नातेवाईकांना अत्यंविधीसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडल्याचं दिसंतय.



दरम्यान, शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यानं अनेकांना वनवन भटकावं लागतंय.. रेमेडेसीवरचा तुटवडाही जाणवत असतांनाच भिंगार शहरालगत वडारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या म्हस्के हॉस्पिटलमधून पोलीस आणि अन्न व औषध प्रशासननं छापा टाकत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा करण्यात आलेला साठा जप्त केला.

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची मृतकांचा आकडा, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि रेडमिसीवरचा तुडवटा या कारणामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून  जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील या परिस्थितीला कसा सामना करतेय, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!