Just another WordPress site

जागतिक हास्य दिन पहिल्यांदा भारतातल्या ‘या’ शहरात झाला साजरा

हसणं ही निसर्गानं माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. इतर कोणताही सजीव तुम्ही हसतांना पाहिला नसेल. खरंतर मनापासून आणि खळखळून हसणं हा कोणतंही दुःख दूर करण्याचा एक रामबाण उपाय आहे. निखळ हसणारा माणूस कायम आनंदी आणि उत्साही असतो. म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक प्रत्येकानं घ्यायलाच हवं. यावर्षी २ मे हा दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हास्य दिनाचा नेमका इतिहास काय? हा दिवस का साजरा केला जातो? हसण्याचे नेमके काय फायदे आहेत? याच विषयी आज आपण  जाणून घेणार आहोत.हास्य ही मुळात एक ग्लोबल लॅंग्वेज आहेय. जगातील सगळी माणसं आनंद व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. मात्र सततच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या ताणतणावामुळे आपण हसणंचं विसरत चाललोय. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. आणि नैराश्‍यावर प्रभावी औषध असणाऱ्या हसण्याचा सर्वांना विसर पडू लागलाय. अनेकांच्या चेहऱ्यावरून हसू गायब झालेलं दिसतंय. आज सगळ्यांना हसण्यासाठी निमित्त शोधावे लागतंय. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो.


जागतिक हास्य दिनाची इतिहास काय?

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. ११ जानेवारी १९९८ रोजी मुंबई इथं पहिल्यांदा जागतिक हास्य दिन आयोजित करण्यात आला होता. जागतिक हास्य योग आंदोलन या चळवळीचे संस्थापक डॉ मदन कटारिया यांना हा  दिन साजरा करण्याचं श्रेय जातं. 

आज दिवसभरामध्ये जवळपास १०० देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाची लोकप्रियता ‘हास्य योग आंदोलन’ च्या माध्यमातून जगभर पसरली. आज जगभरात सहा हजारांहून अधिक कॉमिक क्लब आहेत.


जागतिक हास्य दिनाचा उद्देश

हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश हा लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणं हाच आहे. या शिवाय जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.


कृत्रिम हसा, पण हसा

‘ज़िंदगी ज़िंदादिली का नाम है, मुर्दादिल क्या खाक जिया करते हैं’ म्हणूनच हसणं फार महत्वाचं आहे. मात्र आज धकाधकीच्या जीवनात लोकांचं हसण्याचं प्रमाण कमी झालं. परिणामी, नकारात्मकतेत वाढ होऊन ताणतणावात जगणं वाढलं आहे. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे म्हणजे हसत राहणं. कृत्रिम हसत राहिलं तरी चालेल, मात्र, हसणं गरजेचं आहे. कारण हसल्यानं आनंद, प्रसन्न वाटते. हसल्यामुळं मेंदूमधील ‘हॅपीनेस सेंटर अ‍ॅक्टिव्ह’ होते आणि याचे फायदे आपल्या मनावर आणि शरीरावर होतात. जीवनात तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुम्ही नेहमीच हसत राहिले पाहिजे.


स्माईलीचा जन्म कसा झाला?

सोशल मिडियाची ओळख असलेली स्माईली १९६३ साली जन्माला आली. त्याचं झालं असं कि, अमेरिकेतल्या एका विमा कंपनीचे दुसऱ्या कंपनीत विलीनीकरण झालं. आणि त्यामुळं त्या विमा कंपनीचे कर्मचारी नाराज झाले होते. त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आणण्यासाठी विमा कंपनीनं जाहिरात कंपनी चालवणाऱ्या हार्वी रस बॉल याच्याशी संपर्क साधून काहीतरी करायला सांगितलं. तेव्हा हार्वीनं पिवळ्या रंगाचा एक हसरा चेहरा रेखाटला. 

तीच पहिली स्माईली आहे.  हार्वीनं रेखाटलेला चेहरा कर्मचाऱ्यांना खूपच आवडला आणि लवकरच तो जगप्रसिद्ध झाला. ही स्माईली रेखाटण्यासाठी हार्वीनं ४५ डॉलर्स चार्ज केले होते.


हसण्याचे काय फायदे आहेत?

१. हसण्यामुळे शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळून चैतन्य प्राप्त होते.

२. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दुःख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते.

३. हसल्यानं चेहऱ्यावर टवटवीतपणा कायम राहतो.

४. हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता सक्षम होते.

५. हसल्यानं चांगले विचार येतात आणि वागणं सकारात्मक राहते.

६. हसल्याने जीवन निरोगी राहते, आत्मविश्वास वाढतो.

७. आनंदी आणि हसत राहिल्यानं तणाव वाढत नाही. हृदयाचे आरोग्य हेल्दी राहते.

८. हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. चेहरा टवटवीत दिसतो.


हसणारे गीत गात ओठांवर कायम हसू ठेवा आणि इतरांनाही हसवत रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!