Just another WordPress site

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यामागील ‘मास्टरमाईंड’ हिडमा कोण आहे?

त्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सेनेचे २२ जवान शहीद झालेत. जवानांवर झालेल्या या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. अमित शहा यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून नक्षलवाद्यांविरोधातील लढाई अधिक तीव्र होणार, असं सांगितलं. सुकमा-बिजापूर सीमेदरम्यान झालेल्या या हल्ल्यामागे कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा असल्याचं सांगितलं जातंय. पण हा हिडमा आहे तरी कोण… नेमके त्याच्या विषयी काय समज-गैरसमज पसलेयत…? याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. 
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांचा प्रमुख माडवी हिडमाचं नाव चर्चेत आलं. ३ एप्रिलला सुरक्षा दलाचे जवान माडवी हिडमाला पकडायला निघाले होते. पोलिसांना माहिती मिळाली होती की हिडमा आणि त्याचे साथीदार या भागात आलेत. हिडमाला पकडण्यासाठी गेलेल्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. पन्नास , शंभर नाही तर तब्बल दोन हजार जवानांची टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्याठी जंगलात शिरली होती.


 

सुरुवातीला नक्षलवाद्यांनी जवानांना जंगलात शिरु दिलं. दरम्यान सुरक्षा दलाच्या एका तुकडीला हिडमाच्या टोळीने आपल्या जाळ्यात अडकवलं. आणि जवानांची घेराबंदी करुन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.  या चकमकीत २२ जवानांचा मृत्यू झाला.कोण आहे माडवी हिडमा?

हिडमा विषयी अनेक समज-गैरसमज नागरिकांमध्ये पसरलेले आहेत. मात्र त्याच्याविषयीचं सर्वात प्रसिध्द कथन हे आहे की, सध्या  हिडमा छत्तीसगडमधील बस्तरच्या दंडकर्ण्य प्रदेशातील सक्रीय आहे.  सुकमा जिल्ह्यातील पुर्वटी गावात त्याचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं.हिडमाचे लेटेस्ट असे कोणतेही फोटो नाहीत, तो ४० वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. बस्तरमधील नक्षलवादी चळवळीचा तो चेहरा आहे. हिडमाला हिदमालू आणि संतोष नावानेही ओळखलं जातं.  माहितीनुसार, १० वीपर्यंत शिकल्यानंतर त्याने नक्षलवादाची वाट धरली. आणि अल्पकाळातच तो गोरिला युद्धामधील प्रमुख रणनीतीकार झाला. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, २०१० च्या चिंतलन्नर हल्ल्यात तो सक्रियपणे सहभागी होता, या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६  जवान शहीद झाले होते. झिरम घाटी हत्याकांड,  बुरखाल हल्ल्यातही हिडमाच हात असल्याचं सांगण्यात येतं. ३ एप्रिलला झालेल्या हल्ल्यामागील तो मास्टरमाईंड असल्याचं बोललं जातं. हिडमा हा पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी बलाटीयन नंबर १ चा एरिया कमांडर असून त्याच्यावर ४० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलं.कसा सुरू झाला हिमडाचा प्रवास?

माओवादी पार्टीत हिडमाचं मोठं होणं आश्चर्यकारक आहे.   हिडमाने १९९६-९७ साली मध्ये माओवादी पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्याचं वय फक्त १७ वर्ष होतं. नक्षलवादी होण्याआधी हिडमा शेती करायचा. लहानपणापासून हिडमाला नवनवीन गोष्टी शिकण्यात रस होता.  त्याने माओवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका प्राध्यापकाकडून इंग्रजी भाषाही शिकली! हिडमाची मातृभाषा हिंदी नसली तरीही सुद्धा त्याला हिंदी भाषेचे ज्ञान आहे.  हिडमा २००० सालाच्या आसपास माओवादी संघटनेच्या हत्यारं बनवणाऱ्या शाखेत गेला. तिथे त्यानं हत्यारं बनवायचं प्रशिक्षण घेतलं.  दरम्यान २००१-०२ च्या आसपास हिडमाला संघटनेकडून दक्षिण बस्तर जिल्हा तुकडीत पाठवण्यात आलं. त्यानंतर तो माओवाद्यांची सशस्त्र तुकडी पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीमध्ये सहभागी झाला. बंदुकीचा फार कमी वापर

माडवी हिडमाच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट म्हटली जाते, ती म्हणजे तो चकमकीदरम्यान माओवाद्यांचं नेतृत्व करतो, पण स्वतः फार कमी वेळा बंदूक उचलतो.  हिडमाला बस्तरचा हिरो सुद्धा मानलं जातं.   तो एका स्थानिक आदिवासी समुदायाचा आहे. स्थानिक लोकांशी त्याचे चांगले संबध आहेत. हिडमाच्या लोकप्रियतेमुळे तिथला युवावर्ग त्याच्यासाठी वेडा आहे.

 

हिडमा एक पहेली का आहे?

 – हिडमा कसा दिसतो, त्याची पार्श्वभूमी आणि वय याबद्दल पोलिसांना काहीच माहिती नाही. 


 – काळे-पांढरे फोटो वगळता पोलिसांकडं हिडमाचा कोणताही फोटो नाही. 


 – त्याच्या डोक्यावर ४० लाख रुपयांचा इनाम ठेवण्यात आला आहे. 


 – हिडमा एके ४७ चालवितो शिवाय सुमारे २५०-३०० माओवाद्यांच्या मजबूत गटाचे नेतृत्व करतो. 


– झिरुम घाटी घटनेनंतर तो चकमकीत मारला गेला, अस काहींच मत आहे… तर, त्यांचे नाव माओवादी केडरमधील नेत्याचं पद म्हणून वापरलं जातं. 


दरम्यान हिडमा जीवंत आहे की तो यापुर्वीच मेलेला आहे. यावर बराच संभ्रम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!