Just another WordPress site

गुजरात पोटनिवडणुकीसाठी ८१ उमेदवार रिंगणात

गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण ८१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने काल (मंगळवारी) दिली. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

अब्दासा, लिम्बडी, मोरबी, धारी, गधाडा, कर्जान, डांग आणि काप्राडा या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (दि. १९) अखेरचा दिवस होता. एकूण दाखल झालेल्या १०२ उमेदवारी अर्जांपैकी २१ अर्ज सोमवारी मागे घेण्यात आल्याने आता ८१ उमेदवार रिंगणात असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!