Just another WordPress site

गाडीचे आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

तुमच्या चारचाकी किंवा दुचाकी वाहनाचे आरसीबुक हरवले असेल किंवा मिळत नसेल तर आता अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आरसीबुकची कॉपी अगदी घरबसल्या काढू शकता. त्यासाठी तुम्हांला आरटीओ कार्यालयातही चकरा मारायची गरज नाही. तुम्ही अगदी घरबसल्या पाच मिनिटात तुमच्या वाहनाच्या आरसीबुकची दुय्यम प्रत आता काढू शकता. मात्र ही दुय्यम प्रत कशी काढायची त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात? घरबसल्या आरसीबुक काढण्याची प्रोसेस काय आहे, हेच आपण आजच्या  जाणून घेणार आहोत.अनेकदा घाईगरबडीत तुम्ही प्रवासाला निघता अशावेळी तुम्हांला जर ट्रॅफिक पोलिसांकडंन अडवण्यात आलं, तर त्यावेळी तुमच्या वाहनात आरसीबुक असणं गरजेचं असतं. आरसीबुक तुमच्या वाहनात नसेल तर ट्रॅफिक पोलिसांकडून तुम्हांला दंडही आकारला जाऊ शकतो.  मात्र या सर्व गोष्टीत आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही. परिवहन विभागाकडून आरसीबुक ऑनलाईन पद्धतीनं डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये…

आरसी बुक डाउनलोड करण्यासाठी कोणती कागदपत्र हवीत?


तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर डिजीलॉकर अॅपच्या माध्यमातून तुम्हांला ऑनलाईन आरसी बुकची दुय्यम प्रत काढता येते. यासाठी डिजीलॉकर अॅप मध्ये लॉगिन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार कार्ड आणि आधारशी जोडलेला मोबाइल नंबर हा अनिवार्य आहे. आपण जो मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे, तोच नंबर आपल्याकडं म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. आधारशी जोडलेला नंबर जर आपल्या मोबाईलमध्ये असेल तर त्यावर येणारा ओटीपी हा आपोआप घेतला जाईल. त्याचबरोबर  आपल्या वाहनाचा मुळ नोंदणी क्रमांक आणि पूर्ण चेसिस क्रमांक आपल्याकडं असणं गरजेचं आहे.


आरसी बुक ऑनलाईन कसं डाऊनलोड करता येतं?  

आरसीबुक डाऊनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन  DigiLocker हे अॅप डाऊनलोड करायचं. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक वापरून माहिती सबमिट करायची आहे. ही माहिती सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर क्रमांकावर एक ओटीपी येईल.  हा ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचं अकाऊंट तयार होईल. डिजिलॉकर अकाऊंट तयार झाल्यानंतर तुम्हांला अॅपच्या मुख्यपृष्ठावर परत यायचंय. त्याठिकाणी तुम्हांला स्क्रीनवर Issued Documents असं ऑप्शन दिसेल.


या ऑप्शनला क्लिक केल्यास तुमचं आधार त्याठिकाणी लिंक झालेलं तुम्हांला दिसेल. त्यानंतर तुम्हांला खाली दिलेल्या ब्राऊज या पर्यायावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यास तुम्हांला शासकीय विभागाची यादी दिसेल. या यादीमध्ये तुम्हाला  Ministry of Road and Transport हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हांला मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्टचे डॉक्यूमेंट दिसेल. त्यातील Registration of Vehicles या पर्यायावर तुम्हांला क्लिक करायचंय. या पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चारचाकी दुचाकी, किंवा अन्य वाहनाचा  Registration No आणि Chassis No सारख्या तपशील भरायचा आहे. हा तपशिल भरल्यानंतर  Get Document या पर्यायावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या वाहनाच्या आरसीची संबंधित माहिती दर्शविली जाईल. आता Issued Documents वर क्लिक केल्यास तुमच्या वाहनाचं आरसीबुक डाऊनलोड होईल. हे डॉक्युमेंट तुम्ही पीडीएफ स्वरुपात सेव करू शकता. यासाठी कोणतेही चार्जेस, किंवा फीस तुम्हांला आकारली जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!