Just another WordPress site

खा. संजय राऊतांच्या जामीनासाठी उद्धव ठाकरे हे भाजपसोबत तह करतील का?

गेल्या एका महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामीनासाठी त्यांचे भाऊ सुनिल राऊत आता अॅक्शन मोडवर आले.  मातोश्रीनंतर सुनिल राऊत थेट दिल्लीत दाखल झाले. त्यामुळं राऊत कुटुंबीयांकडून भाजपसोबत सेटलमेंट केली जात असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय.

महत्वाच्या बाबी

१. खा. राऊतांसाठी सुनिल राऊत दिल्लीत पोहोचले
२. ठाकरेंकडून BJPशी सेटलमेंट होत असल्याची चर्चा
३. खा. राऊत बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही
४. संजय राऊतांना  BJPकडून सॉफ्ट कॉर्नर मिळेल का?

 

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर संजय राऊत हे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर रोजच तुटून पडत होते. राऊत यांच्या आक्रमक भूमिकांमुळे भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट टोकाला गेले होते. त्यातूनच ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून बाहेर काढून बंडखोरांसोबत सरकार आल्यानंतर भाजपने राऊतांना जेलमध्ये टाकलं. मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना अटक केली. आता राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला असून ते आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. दरम्यान, राऊतांनी जामिनासाठी अर्ज केला असून, या प्रकरणी १६ सप्टेंबरपर्यंत ईडीला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अशातच त्यांचे बंधू सुनील राऊत  यांना अचानक मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांनी बोलावून घेत संजय राऊत यांची विचारपूस केल्याची माहिती मिळाली. या भेटीनंतर सुनील राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. यामुळेच त्यांनी मला बोलावले आणि त्यांनी आमच्या कुटुंबाची विचारपूस केली, असे सुनील राऊतांनी सांगितले. शिवाय,  संजय राऊतांच्या जामिनासाठी अर्ज केलेला असून लवकरच त्यांना जामीन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुनील राऊत यांनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तेथून पाय काढताच ते थेट मुंबई विमानतळाकडून दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. ते दिल्लीत भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुटकेसाठी धडपड करीत असल्याची माहीती पुढे आली. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊत यांच्या सुटकेसाठी  ‘मातोश्री’ म्हणजेच दस्तुरखुद्द उध्दव ठाकरेंनीच दिल्लीतील भाजप वरिष्ठांशी  फिल्डिंग लावल्याचे समजते. याच दरम्यान महाराष्ट्रातील एक ‘ताकदवान’ नेताही ठाकरेंच्या मदतीला धावून आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, राऊत यांना खरोखर भाजपकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जाण्याची शक्यता कमी आहे. कारण, राऊत यांच्याविरोधात आज भाजपाचे डझनाहून जास्त नेते आहेत, ते संजय राऊत यांना जामीन मान्य करणार नाहीत, असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे शिवसेना आता भाजप नेत्यांपुढे हात टेकून आपल्या नेत्याला सहीसलामत बाहेर आणणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.दरम्यान, राऊतांना वाचविण्यासाठी भाजपचा कोण नेता आपले ‘वजन’ वापरत आहे आणि त्यासाठी शिवसेना म्हणजेच ठाकरे हे भाजप विरोधातील तलवारी म्यान करून भाजपसोबत काय समझोता करणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!