Just another WordPress site

कोरोना लस टोचून घेण्याआधी ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा…

देशासह राज्यात कोरोना व्हायरसनं मोठा धुमाकूळ घातला आहे.  कोरोनाला लगाम घालण्यासाठी सरकारनं लसीकरण मोहीम हातात घेतलीय. सरकारनं राज्यातील ४५ वर्षापुढील नागरिकांना ही लस देण्यास सुरूवात केली. मात्र, ही लस टोचून घेण्याआधी काही खबरदारीही घेणं गरजेचं आहे. नेमकं लसीकरण करून घेतांना काय खबरदारी घेतली पाहीजे या विषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. लसीकरणाआधी २४ तास पेन किलर घेऊ नका

२. लस टोचण्याआधी मद्यपान करू नका

३. लसीकरणाच्या आदल्या रात्री जागरण करू नये

४. लसीकरणाच्या दरम्यान अन्य लस घेऊ नका

काय खबरदारी घ्यायला पाहीजे ?

जर तुम्हांला लसीकरण करून घ्यायचे असल्यास लसीकरणाच्या २४ तास आधी पेन किलर घेऊ नका. अन्यथा, लस टोचून घेतल्यानंतर रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे लसीकरणाआधी कोणत्याही वेदनाशमक गोळ्या घेणं टाळा. दुसरी महत्वाची बाब म्हणजे,  लस टोचण्याआधी मादक पदार्थांचे सेवन करू नका. अन्यथा, डीहायड्रेशन आणि हँगओव्हर होऊ शकतो. जे की, कोरोना लसीला निकामी करू शकतं. त्याचबरोबर लस घेण्याच्या आदल्या दिवशी रात्री जागरण करू नका. चांगली झोप झाल्यास शरीर लसीला चांगला रिस्पॉन्स देतं. लसीकरणाच्या दरम्यान अन्य लस घेऊ नका. जर एखादं इंजेक्शन घेतलचं तर त्यानंतर १४ दिवसांनीच कोरोना लस घ्या. 


लस घेतल्यानंतर लगेचच हॉस्पिटलच्या बाहेर जाण्याची गडबड न करता काही वेळ तिथचं थांबा. लस घेतल्यानंतर तुमच्या हातांना वेदना होऊ शकतात त्यामुळं लसीकरणानंतर किमान काही दिवस वर्कआऊट किंवा अवघड कामं करणं टाळलंच पाहीजे. लस घेतल्यानंतर  तुम्हांला काही वेळ थकवा जाणवू शकतो. त्यामुळे लसीकरणानंतर कमीतकमी दोन ते तीन दिवस आरोग्याकडं लक्ष द्या.  आणि कोरोना लस घेतली म्हणजे आता आपल्याला कोरोना होणार नाही, या निष्काळजी भ्रमात राहू नका. निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रसार  वाढतो. त्यामुळे लसीकरणांनंतरही मास्कचा वापर करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!