Just another WordPress site

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करणं किती सुरक्षित? तज्ज्ञ काय म्हणतात?

दिवसेंदिवस देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. या कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क वापरणं, तसंच वारंवार हात धुणं आपल्याला गरजेचं आहे. मात्र, जेव्हा दोन व्यक्ती शरीरसंबंधांच्या ओढीने जवळ येतात, तेव्हा सोशल डिस्टन्सिंग राखणं ही एक अशक्य गोष्ट असते. मग अशा वेळी पुरुष किंवा स्त्री कोरोनाबाधित असेल, तर जोडीदाराला सुद्धा कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना काळात सेक्स करतांना काय काळजी घेतली पाहीजे, कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करणं कितपत योग्य, या आणि अशा अनेक प्रश्नांविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.



सेक्स ही एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे शरीरसंबंधांच्या ओढीनं जवळ येणाऱ्या जोडप्यांनी कोरोना काळात कोविड १९  ची बाधा टाळण्यासाठी सेक्स करताना काय काळजी घ्यायला हवी? काय करायला हवं आणि काय टाळायला हवं? शिवाय लस घेतल्यानंतर सेक्स करू शकतो की नाही?  कोरोना लस घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहेय?  याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. आरोग्य मंत्रालयामार्फत मात्र याबाबत काहीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्यायला हवी, याबाबत तज्ञांनी काही सुचना केल्यात. पाहूयात तज्ञ काय म्हणतात- 


सेक्स करतांना काय काळजी घ्यावी?

कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात मृतांचा आकडा वाढला असल्याने कोरोना टाळण्यासाठी आपण योग्य खबरदारी घ्यायला हवी. कोरोना काळात सेक्स करतांना मास्क घालण्याचा सल्ला तज्ञांनी दिली. तसंच किसिंग टाळावं असंही सांगितल. कारणं चेहरे जवळ आले म्हणजेच किसिंग करताना करोनाची लागण होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. किसिंगमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं न्यूयॉर्क सरकारच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे.


लैंगिक संबंधातून कोरोना पसरतो का?

एप्रिल महिन्यात अमेरिका आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका गटाने वीर्यामधून  कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचा दावा केला होता. अमेरिका आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका गटानं कोरोनाची बाधा झालेल्या चीनमधील ३४ प्रौढ पुरुषांच्या वीर्याचे परीक्षण केलं होतं. त्यात कुठेही कोरोनाचे विषाणू आढळले नाहीत. फर्टिलिटी आणि स्टरिलिटी जर्नलमध्ये त्यांनी आपले निष्कर्ष नोंदवलं होतं. त्यामुळं वीर्यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही फार कमी असते.


हस्तमैथुन सर्वात सुरक्षित पर्याय

महत्वाचं म्हणजे, वीर्यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण, कोरोना काळात शारीरीक जवळीक जितकी कमी ठेवाल तितका या आजाराची बाधा होण्याचा धोका कमी होईल. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हस्तमैथुन सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचा सल्ला न्यूर्यार्कच्या सरकारने तिथल्या नागरिकांना दिला आहे.


लसीकरणांनंतर सेक्स करणं कितपत सुरक्षित ?

सेक्स केल्याने कोरोना होतो की नाही या प्रश्नानंतर आता लस घेतल्यानंतर सेक्स करतांना काय काळजी घ्यायला हवी असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतात सध्या कोरोना लसीकरण सुरू झालं असून काही प्रमामात लशीचे दुष्परिणामही दिसून येताहेत. मात्र, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी हे सांगितलं जात नाही.  काही तज्ज्ञांच्या मते, लस घेतलेल्या व्यक्तींनी किमान एक वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरायला हवेत. अन्यथा याचा याचा भ्रूण किंवा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो.


गर्भनिरोधकांचा वापर करा

कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कंडोमसारख्या गर्भनिरोधकांचा वापर करायला हवा. कारण लशीचा दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहे आणि त्याचा पुरुष किंवा महिलांच्या सेक्सवर काय प्रभाव होतो हे अद्याप सांगणं अशक्य आहे. शिवाय, सेक्स दरम्यान शरीरातील द्रव घटक एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कंडोमचा वापर करणं उत्तम आहे.


सेक्स ही माणसाची मुलभूत गरज असून सध्या सेक्स करतांना बचावात्मक मार्गाचा वापर करा. आणि आपल्या सेक्सुअल लाईफचा आनंद घेत कोरोनापासून आपला आणि आपल्या जोडीदाराचा बचाव करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!