Just another WordPress site

कोरोना काळात रक्ताचा तुडवडा; असं करता येईल रक्तदान

 राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यादरम्यान राज्यात आता रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कॉलेजांना सुट्टी असल्यामुळं तसंच रक्तदातेही गावी गेल्यामुळं रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यातच यंदा कोरोना निर्बंध अधिकच कठोर केल्यामुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये फारसं रक्त संकलन झालेलं नाही. पुरेशी काळजी घेऊन रक्तदान केल्यास रक्तदात्याला कोणताही धोका नसल्याचंही सरकारने म्हटलंय. मात्र तरीही अनेकांनी रक्तदानाकडे पाठ फिरवली आहे. जोपर्यंत इच्छुक रक्तदात्यांची नवी फळी तयार होत नाही, तोपर्यंत रक्ताच्या तुटवडा भेडसावत राहील, असे काळजीचा सुर वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त करत   रक्तदान शिबीरे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे रक्तदान या विषयी आपण जाणून घेणार आहोत.


रक्तदानाला श्रेष्ठदान असं म्हटल्या जातं. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजून व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. त्यामुळे रक्तदान करणे माणुसकीचे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. मात्र अलीकडे रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे राज्यात रक्तपेढींची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यामुळे रक्तदानाचं गांभीर्य लक्षात घेऊन रक्तदान करणं गरजेचं झालंय


 रक्तदान कोण करू शकतो? 

 १. ज्या दात्याचे वय अठरा ते पासष्ट वर्षे आहे तो दाता रक्तदान करू शकतो

 २.  ज्याचे वजन ४८ किलोपेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीनेच रक्तदान करावे

३.  ज्यांनी मागील तीन महिन्यापासून रक्तदान केले अशी व्यक्ती रक्तदान करू शकते.

४. क्षयरोग, फिरंग, हिपाटायटीस, मलेरिया, मधुमेह आणि एड्स ह्या विकारांनी पीडीत नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात.

५. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कुठलाही संसर्गजन्य आजार नसावा.


साडेतीनशे मिली रक्तच घेतात

साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पाच लिटर रक्त असते. त्यातून रक्तदानात केवळ साडेतीनशे मिली एवढेच रक्त घेतलं जातं. दररोज आपल्या शरिरामध्ये नवीन रक्त तयार होत असते. आपले शरीर २४ तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पुर्ती करत असते.


कोठे कराल रक्तदान ?

रक्तदान कोणत्याही लाईसेन्स युक्त ब्लड बॅंकेत करता येते. याशिवाय सरकारी रूग्णांलयामध्येही रक्तदानाची सुविधा उपलब्ध असते. तसेच मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था जसं की,  रोटरी क्लब, लायंस क्लब द्वारा वेळोवेळी रक्तदान शिबीरांचे आयोजन केल्या जातं. तिथे रक्तदान करता येऊ शकते.


रक्तदान केल्याने कोणताही त्रास होत नाही

रक्तदानाविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेक जणांच्या तोंडून तुम्ही ऐकले असेल की, रक्तदान शरीरासाठी घातक आहे. रक्तदान केल्याने शरीर अशक्त होतंय.  पण खरचं रक्तदानामुळे कोणताही त्रास होत नाही. रक्तदान करण्यासाठी ५ ते १० मिनीटांपर्यंत वेळ लागतो. रक्तदान केल्यांनंतर आपण दररोजची कार्ये अगदी दररोज प्रमाणेच करू शकता. रक्तदात्याच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकुल परिणाम रक्तदानाने होत नाही. 

रक्तदाता कार्ड

स्वच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना रक्तदान केल्यांनंतर १२ महिन्यापर्यंत रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास ब्लड बॅंकेतर्फे एक युनिट रक्त दिले जाते.


रक्तदानाचे फायदे

१. नियमीत रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत राहतो.

२. रक्तदान करणाऱ्यांमध्ये हार्ट अॅटॅकचा धोका ८८ टक्यांनी कमी होतो.

३. रक्तदानामुळे रक्तांच्या नवीन पेशींच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो… त्याचा थेट फायदा असा होतो की, आपण निरोगी आणि उत्साही राहतो.

४. नियमीत रक्तदानामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होतो.

५.  रक्तदान केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते


एकविसाव्या शतकात मानवाने अनेक क्षेत्रात  महत्वपूर्ण शोध लावलेत.  परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेलं नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही… त्यामुळे मानवी रक्ताला अद्याप माणसाला पर्याय मिळाला नाहीये. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते.. त्यामुळे रक्तदान करून  समाजात एक नवा आदर्श निर्माण करूया.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!