Just another WordPress site

कोरोनाची लस घ्यायची आहे? अशी करा आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी

देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असून कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनं काही ठोस निर्णय घेतलेत. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नुकतीच केंद्रानं १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषणा केली. त्यानुसार येत्या १ मे पासून १८ वर्षा वरील सर्व वयोगटाचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारनं सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक आणि ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून यात १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी पुर्वीप्रमाणंच आताही लसीकरणासाठीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे.हाईलाईट्स

१. कोविन पोर्टलवर करता येणार नोंदणी

२. उद्यापासून होणार नोंदणी प्रक्रिया सुरू

३. खाजगी रुग्णालयातही करता येणार लसीकरण

४. १ मे पासून घेता येणार लसीकरणाचा लाभ


कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?

– लसीकरणासाठीची नोंदणी करण्यासाठी आधी तुम्हांला गुगलवर जाऊन cowin.gov.in असं टाईप करावं लागेल. 

– वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रोल करून खाली या, तिथे तुम्हाला ‘Find Your Nearest Vaccination Center’ हा पर्याय दिसेल. यावरील Registration Yourself या पर्यायावर तुम्हांला क्लिक करायचं आहे.

– आता Register/ Sign in yourself मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल टाकायचा आहे.

–  मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो तुम्हाला खाली टाकायचा आहे. आणि सोबतच  Verify बटनावर क्लिक करायचंय.

– नंतर ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुम्हाला तुमची माहिती भरावा लागणार आहे. आणि Register या बटनावर क्लिक करायचं आहे.

–  त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा एक मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.

– एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.


सगळी प्रक्रीया केल्यानंतर तुम्हाला  तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल. कोरोनाची लस ही पुर्णपणे सुरक्षित असून १८ वर्ष वयोगटातील जवळपास सर्वच जणांनी ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!