Just another WordPress site

कोरोनाची लस घेण्याआधी अन् घेतल्यानंतर काय खायचं आणि काय नाही?

गेल्या काही दिवसांपासून देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने मोठा धूमाकुळ घातलाय. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम जोमात सुरू आहे. या लसीककरण मोहिमेअंतर्गत राज्यात दररोज लाखो नागरिकांना कोरोना लस लस देण्यात येते. लस घेण्याआधी आहाराच्या संदर्भात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, तुमचा आहार हा लसीकरणानंतर शरीरात होत असलेल्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे नेमकं कोरोनाची लच टोचून घेण्याआधी काय दक्षता घेतली पाहिजे? आहारात कुठल्या गोष्टीचा समावेश करावा हेच आपण जाणून घेणार आहोत.


कोरोनाची लस घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डाएटच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. संतुलित आणि हेल्दी आहार तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी फायेदशीर असतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि कोरोनाच्या इंफेक्शनचा धोका कमी होतोय.

हायलाईट्स

१. पाणी आणि फायबर्सचं प्रमाण असलेल्या पदार्थांचं सेवन करा

२. फळांचा किंवा ज्यूसचा समावेश आहारात असावा

३. लस घेतल्यांतर पौष्टीक अन्नपदार्थ खायला हवे.

४. कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान टाळा.

कोरोना लस घेतल्यावर काय आहार घ्यावा ?

कोरोनाची लस टोचून घेण्याआधी आणि लस टोचून घेतल्यानंतर शरीराला हायड्रेड ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आहारात जास्तीत जास्त पाणी, फळं आणि पालेभाज्यांचा समावेश करा.


महत्वाचं म्हणजे, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शिवाय अशा पदार्थाचं सेवन करा की ज्यात पाणी आणि फायबर्सचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर तिची परिणामकारता वाढेल. त्यामुळेच जास्त कॅलरीजयुक्त आहार टाळून फायबर्स असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. फायबर्सयुक्त आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.  या महामारीच्या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. याशिवाय  लस घेतल्यांतर पौष्टीक अन्न खायला हवं.


त्याचबरोबर ओट्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

लस घेतल्यानंतर कोणत्या गोष्टीचं सेवन टाळलं पाहिजे?  

कोरोनाची लस घेतल्यानंतर सॅच्यूरेटेड फॅट्स आणि जास्त साखरयुक्त आहार घेणं टाळायला पाहिजे. शिवाय तळलेले पदार्थांचं सेवन देखील काही दिवसांसाठी टाळलं पाहिजे. लसीकरणानंतर तुम्हांला कदाचित ताप, अंगदुखी जाणवू शकते. अशावेळी तब्येतीची काळजी घेण्यासाठी मद्यपान करू नका.


जर दारू किंवा सिगारेट पीत असाल तर लसीकरणानंतर यापासून लांब राहा. कारण लसीकरणानंतर कमीत कमी तीन महिने तुम्ही मद्यपान, धुम्रपान टाळायला हवं.


लस घेण्याआधी आणि लस घेतल्यानंतर आहारकडं आणि आरोग्याकडं लक्ष द्या. केवळ लस घेतली म्हणजे, कोरोना होणार नाही, असं नाही. त्यासाठी आरोग्याची निगा राखून रोगप्रतिकार शक्ती वाढवणंही तितकचं गरजेचं आहे. त्यामुळे प्रोटीन्सयुक्त आहार घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!