Just another WordPress site

एसडीएमची दादागिरी! भर रस्त्यावर तरूणाला कानशिलात लगावली, अन्….


वेब टीम सुरजपूर : छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. त्यामुळं त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. ते प्रकरण शांत होत नाही, तोच सूरजपूर येथील एसडीएम प्रकाशसिंग राजपूत यांचा असाच व्हीडिओ समोर आला. या व्हीडिओमध्ये प्रकाशसिंग राजपूत एका युवकाला रस्त्यावर थोबाडीत मारताना दिसत आहेत. मात्र, एवढे करून ते थांबले नाहीत, त्यांनी तेथेच त्या युवकाला उठ-बश्या काढायला लावल्या. दरम्यान हा तरुण त्यांची हात जोडून माफी मागताना देखील दिसत आहे. या आधी जिल्हाधिकाऱ्याने एका तरुणाला मारल्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी आपली चुकी मानून त्या मुलाची माफी मागितली. त्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तातडीने रणबीर शर्मा यांची बदली केली. त्यामुळे आता या पोलिस एसडीएम प्रकरणात छत्तीसगड सरकार काय कारवाई करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे.

Like if you agree with this.
RT if you think innocent citizens should also have the right to slap back oppressive officers like SDM Prakash Singh Rajput of Surajpur, Chattisgarh.
pic.twitter.com/mnLOmHlXon

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 23, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!