Just another WordPress site

एकेकाळी मोदींवरही केले होते आयपीएस अधिकाऱ्यानं आरोप!

आता हळूहळू राज्यातील ओंगळ राजकारचा चेहरा समोर येऊ लागला आहे. सत्तेसाठी राजकारणी कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण तर आपल्याला काही नवीन नाही. गेल्या दिडेक वर्षापासून जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात चाललयं, ते आता सामान्य जनतेला सवयीचं झालं आहे. २०१९ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर सत्तेच्या खुर्चीत बसलेलं नवं सरकार कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं दिसून येतंय.



हाईलाईट्स

१. महाराष्ट्रात जे घडतंय ते काही देशात नवीन नाही

२. २०१३ ला IPS अधिकाऱ्याने मोदींवर केला होता आरोप

३. IPS अधिकारी डी जी वंजारा यांनी लिहलं होतं पत्र

४. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही घडलं होतं प्रकरण


आताचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर,  मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी  गृहमंत्री अनिल देशमुखांवर मोठा आरोप केला. गृहमंत्र्यांनी सचिन वझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गोप्यस्फोटही परमबीरसिंग यांनी केलाय. यावर परमबीर सिंग अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. दरम्यान न्यायालयानं आपल्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मात्र राज्यात जे सध्या घडतंय किवा घडू लागलंय हे काही देशात पहिल्यांदाचं घडलेलं नाही. याआधीही बऱ्याच अधिकाऱ्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केलेत. 


तुम्हाला वाचून धक्का बसेल पंतप्रधान  नरेंद्र मोदींवरही अशा स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. २०१३ ला जेव्हा  नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आलं  तेव्हा एका गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांने थेट आजचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यात मला चुकीच्या एकाउंटर प्रकरणी अडकण्यात आलं आणि निलंबित करण्यात आलं असं  नमूद केलंय. मोदींवर आरोप करणाऱ्या या आयपीएस अधिकाऱ्यांचं नाव होतं डी जी वंजारा.   



प्रकरणं नेमकं असं होतं की, २००० साली गाजलेल्या सोहराबुद्दीन केस प्रकरणात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात होतं. या प्रकरणात शेख नावाच्या एका व्यक्तीचं एन्कांऊटर करण्यात आला होता. या एन्काऊंटरचा प्रजापती नामक एक व्यक्ती हा एकमेव साक्षीदार होता. मात्र २००६ ला प्रजापती यांचंही एन्काऊंटर करण्यात आलं.  ज्या हद्दीत प्रजापती यांचं एंकाउंटर करण्यात त्याच हद्दीत १३ दिवसांपूर्वीच वंजारा यांची बदली करण्यात आली होती.  त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि वंजारा यांच्यावर प्रजापतीच्या एन्काऊंटरचा आरोप करण्यात आला. काही दिवसानंतर वंजारा यांना अटकही करण्यात आली. 



दरम्यान राजीनामा देत असतांना वंजारा त्यांनी दहा पानी पत्र लिहत, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांनीच मला चुकीच्या एन्काऊंटर प्रकरणात बळीचा बकरा बनवलं असा आरोप केला होता. मात्र हे प्रकरणही काही दिवसानंतर थंड पडलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!