Just another WordPress site

आता पुन्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक, ई-पास कसा काढायचा?

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असून कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला.  प्रवासावरही निर्बंध घातले असून जिल्हाबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. त्यामुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही जवळपास बंद आहे. त्यामुळं आता जर नागरिकांना आपल्या गावी अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असल्यास किंवा अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असल्यास त्यांना ई-पासची काढणं बंधनकारक आहे. प्रवास करतांना सोबत ई पास नसेल तर तुम्हांला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा ई – पास हा कसा काढायचा असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पुर्वीप्रमाणेच आता ई पास हा ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे.ई-पास कसा काढायचा?

– ई पास काढण्यासाठी तुम्हांला सर्वात अगोदर https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जावं लागेल. किंवा इथं क्लीक केल्यास तुम्ही थेट या वेबसाईटवर जाऊ शकाल.

– संकेतस्थळावर ‘apply for pass here’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही माहिती भरावी लागेल.

– त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे तो जिल्हा निवडायचंय.


– कुठं प्रवास करायचा ते निवडल्यानंतर तुम्हाला काही अत्यावश्यक कागदपत्रे इथं जोडावी लागणारहेत.

– प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहेत याची सुद्धा माहिती तुम्हांला याठिकाणी देणं बंधनकारक आहे.


– ही सर्व माहिती एकत्रितपणे अपलोड करून तुम्ही तुमचा ई पास काढू शकता.


त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर तुम्हांला एक टोकन आयडी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? तसंच ई पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. तसंच टोकन आयडी टाकून साइटवरून ई पास डाऊनलोड करता येते. तुम्ही डाऊनलोड केलेली ही ई पास तुम्हाला प्रवासा दरम्यान सोबत ठेवावी लागेल. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून तुम्हाला प्रवास करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!