Just another WordPress site

‘….मी व्हाईट हाउसला बाहेरून बघितलं’; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचे निवासस्थान व्हाईट हाऊसला (The White House) भेट दिली. यावेळी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. दरम्यान, नरेंद्र मोदींनी 3 दशकांपूर्वीची जुनी आठवण सांगितली. (“…that was the first time I saw the ‘White House’ from outside” said Prime Minister Modi reminiscing 30 years ago)

व्हाईट हाऊसमधील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, “आज व्हाईट हाऊसमध्ये एक अप्रतिम स्वागत झालं. हा 140 देशवासीयांचा आदर आहे. हा सन्मान अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या चार लाखांहून अधिक नागरिकांचा आहे. या सन्मानाबद्दल मी जो बायडेन यांचा मनापासून आभारी आहे.”

दरम्यान, यावेळी मोदींनी 30 वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, “तीन दशकांपूर्वी मी एक सामान्य नागरिक म्हणून अमेरिकेच्या दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी व्हाईट हाउसला बाहेरून बघितलं होतं. पंतप्रधान बनल्यानंतर मी स्वत: इथे अनेकदा आलो आहे. पण, एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदा उघडले. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक आपलं कौशल्य, कर्म आणि निष्ठेने भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. तुम्ही सर्वजण भारत-अमेरिकेच्या संबंधातील खरी ताकद आहात. आज तुम्हाला दिलेल्या सन्मानासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना हृदयापासून धन्यवाद देतो.”

“दोन्ही देशातील समाज आणि व्यवस्था लोकशाही मूल्यांवर अधारित आहे. दोन्ही देशांच्या संविधानातील पहिले तीन शब्द ‘we the people’ असे आहेत. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देशांना आपल्या विविधतेचा अभिमान आहे,” असंही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!