इस्लमाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आलंय. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याविषयी तपास यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता.