Just another WordPress site

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे उमेदवारी अर्जापाठोपाठ जि.प. सदस्यत्वही गेले

विभागीय आयुक्तांचे आदेश : जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याचा फटका

Rashmi Barve Zilha Parishad Membership Cancelled : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचे जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचा रश्मी बर्वे रामटेक लोकसभा मतदारसंघातील Ramtek Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे बर्वे यांना दुहेरी धक्का बसला आहे.

शरद पवारांना मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार ? 

रश्मी बर्वे या अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषदेच्या पारशिवणी तालुक्यातील टेकाडी सर्कलमधून निवडून आल्या होत्या. परंतु जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने बर्वे जिल्हा परिषद सदस्यत्वही यांचे संपुष्टात आले आहे.

बर्वे यांना १७ फेब्रुवारी २०२० ला जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या टेकाडी सर्कलमधून त्यांनी निवडणूक लढवली. यात त्या विजयी झाल्या होत्या. परंतु बर्वे यांना खोटे दस्तऐवज जोडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केल्याबाबतची तक्रार सुनील उत्तमराव साळवे यांनी केली होती. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार रश्मी बर्वे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, तसेच त्यांच्याकडून टीए, डीए प्रवास भत्ता, बंगला (इतर सरकारी खर्च ) या बाबी वसूल करण्यात याव्या व आवश्यक ते निर्देश देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्यात यावी, अशी मागणी साळवे यांनी केली होती.

काय होती तक्रार, नंतर काय झाले…..
■ तक्रार अर्जानुसार बर्वे यांच्या कुटुंबाचे मूळ वास्तव्य महाराष्ट्र राज्यातील नसताना, त्यांनी रक्तनातेसंबंधित नसणाऱ्या व्यक्तीचे दस्तऐवज समितीकडे सादर करून तत्कालीन समितीची फसवणूक व दिशाभूल करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा आरोप केला होता.

■ त्यानुसार चौकशी केली असता, बर्वे यांच्या वडिलांचे वास्तव्य नागपूर जिल्ह्यातील नसताना त्यांनी उपविभागीय अधिकारी काटोल यांच्याकडून चांभार अनुसूचित जाती या जातीचे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे आढळून आले.

■ त्यानुसार जात पडताळणी समितीने २८ मार्च २०२४ला बर्वे यांचे जात ३यात आल्याचा आदेश जारी केला होता. या निर्णयाचा आधार घेत त्याच दिवशी छाननीत त्यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविला होता.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
■ जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज बाद ठरविण्याच्या निर्णयाला रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
■ यासंदर्भात न्यायालयात काय निर्णय लागतो. यावर त्यांचे राजकीय भवितव्य असल्याने या निर्णयाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!