Just another WordPress site

Noida Twin Towers Demolition : ठरलं, नोएडामधील ३२ मजली Twin Tower केवळ १२ सेकंदात भुईसपाट होणार!

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश देण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार, नोएडातील सेक्टर ९३ मधील वादग्रस्त ठरलेली ३२ मजली सुपरटेक ट्विन टॉवर इमारत येत्या २८ ऑगस्टला केवळ १२ सेकंदात जमीनदोस्त होणार आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेली ही इमारत आता अखेर भूईसपाट होणार आहे. जमीनदोस्त होणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे.



महत्वाच्या बाबी 

१. ठरलं, २८ ऑगस्टला पाडले जाणार Twin Tower 

२. Twin Tower उत्तर प्रदेशमध्ये नोएडामध्ये आहे 

३. नियंत्रित स्फोट करून पाडले जाणार Twin Tower 

४. Twin Tower ची उंची सुमारे १०३ मीटर एवढी आहे


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट २०२२ रोजी हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकले जाईल. सीबीआरआयने ट्विन टॉवर पाडण्याच्या प्रस्तावाला लेखी मंजुरी दिली. एडिफिसच्या उत्कर्ष मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार नियंत्रित स्फोट करून सुपटेक ट्विन टॉवर नऊ सेकंदात पाडले जातील. हे काम करण्यासाठी परदेशात अशा प्रकारचे काम करण्याचा मोठा अनुभव असलेल्या अभियंत्यांना बोलावले आहे. या अभियंत्यांच्या देखरेखीत नियंत्रित स्फोट केला जाईल. नियंत्रित स्फोटासाठी इमारतीत ठिकठिकाणी विशिष्ट स्फोटके पेरून इमारत विशिष्ट पद्धतीने पाडली जाईल. इमारत पाडण्याचे काम सुरू असताना सुपरटेक ट्विन टॉवर आणि आसपासच्या भागात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली जाईल. आवश्यक ते सुरक्षेचे उपाय करूनच इमारत पाडण्याचे काम पूर्ण केले असं त्यांनी सांगितलं.  त्यासाठी ५ हजार  लोक जे या इमारतीच्या आसपास राहतात, त्यांना काही काळासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल. खरंतर या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. हे टॉवर सुपरटेक बिल्डरने  बेकायदेशीरपणे बांधले होते. मात्र,  या मंजुरीला आक्षेप घेण्यात आला होता. अखेर अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने या इमारतीला नोएडा विकास प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ही इमारत भूईसपाट होणार हे निश्चित झाले. ही इमारत मुंबईतील ईडीफीस इंजीनिअरिंग आणि दक्षिण आफ्रिकेतील जेट डेमोलेशन कंपनी भूईसपाट करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारत पाडण्यासाठी  ३ हजार ५०० किलोग्रॅम विस्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. या स्फोटकाने १३ व्या मजल्यावरील १ कॉलम आणि बेसमेंटमधील ५ कॉलम ब्लास्ट होणार आहेत. ३५ हजार घनमीटर मलबा ही इमारत पाडल्यानंतर जवळपास जमा होण्याची शक्यता आहे.  रविवारला दुपारी अडीच वाजता ही इमारत पाडली जाणार आहे.  तेव्हा धुळीने वातावरण व्यापले जाणार असल्याने या काळात दिल्ली विमानतळावरून विमानांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. जवळपास अर्धा तास दिल्लीच्या आकाशात विमान राहणार नाही.दरम्यान,  या इमारतीची उंची सुमारे १०३ मीटर आहे. एवढी उंच इमारत भारतात  प्रथमच पाडली जाणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!