Just another WordPress site

Nagar Urban Bank Scams : तपासात घोटाळेखोरांची यादी व्हायरल, बहुतांशी आरोपी गायब, पोलीस हतबल ; न्यायालयाकडून ताशेरे

नगर : फॉरेन्सिक ऑडीटनंतर नगर अर्बन बँकेच्या घोटाळेखोरांना (Nagar Urban Bank Scams) अटक करण्यासाठी पोलीस जोरदार शोध मोहिम राबवित आहेत. पण आरोपी काही मिळत नाही. बहुतांशी आरोपी नगरमधून गायब झाल्याची आता चर्चा आहे. आपले नाव अटकेच्या यादी असल्याची माहिती मिळाल्याने ही मंडळी गायब झाली आहे. काही दिवसापूर्वी अर्बनच्या गैरव्यवहार व घोटाळ्यातील आरोपींच्या नावांची यादी व्हायरल झाली होती. त्यामुळे हे आरोपी आता फरार झाले आहेत. (Ahmednagar News)

भारतातील विवाह संस्था टिकली पाहिजे, आपला देश पाश्चिमात्य नाही; SC ने स्पष्ट केली भूमिका 

बँकेतील गैरव्यवहार रकम प्रत्यक्षात ३७८ कोटी १० लाखाची आहे. त्यापैकी ८६ कोटी ८५ लाखाची रक्कम काही कर्जदारांनी परत भरल्याने आता अपहाराची रक्कम २९१ कोटी २५ लाखाची अंतिम झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईच्या डी. जी. ठकरार अँड असोसिएटस या फर्मने बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले आहे व त्यानुसार २०५ जणांनी बँकेत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. या आरोपींचा शोध पोलिसांद्वारे सुरू आहे. यापैकी सातजणांना पोलिसांनी आतापर्यंत पकडले आहे. यात माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया या पाचजणांना मागील महिनाभरात पकडले आहे. तर सचिन गायकवाड व मुकेश कोरडे यांना दीड वर्षापूर्वी पकडले आहे. मात्र, बाकीचे ९८ आरोपी कोठे आहेत, याचा शोध पोलिसांना अजूनही लागलेला नाही.

अकोला पोलिस दलात ३० पोलिस उपनिरीक्षकांची पदे रिक्त; अधिकाऱ्यांवर ताण ! 

ठेवीदारांनी न्यायालयात तक्रार केल्यावर न्यायालयाने पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. आरोपींना पकडण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेशही दिले. पण पोलीस हतबल झाले आहेत. वारंवार शोध घेऊनहीं गायब मंडळी सापडत नाही व त्यांचे मोबाईलही बंद आहेत. त्यामुळेच याचा पाठपुरावा करताना एका लिक झालेल्या यादीमुळे सारे गायब झाल्याची जोरदार चर्चा आहे.

फॉरेन्सिक ऑडीट करणाऱ्या संस्थेतील एकाच्या जबाबात बँकेमध्ये कशापद्धतीने गैरव्यवहार केला गेला, या जबाबात कोणी कसा गैरव्यवहार केला, याची नावानिशी यादीही दिली आहे. त्यात आजी-माजी संचालक, बँकेचे अधिकारी, कर्जदार, संचालकांचे नातेवाईक, हितसंबंधित अशा सर्व १०५ जणांची नावे आहेत. कोणी कशा पद्धतीने गैरव्यवहारातून आर्थिक लाभ घेतला तसेच वाढीव रकमेच्या मालमत्ता मूल्यांकन अहवाला आधारे बँकेच्या कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन करून दिलेले पैसे व त्यातून घेतलेला लाभ आणि अन्य अनुषंगिक बाबींचे व गैरव्यवहारांचे विवरण या जबाबात असून त्याअनुषंगाने असलेले पुरावे मिळून १४८० पानांचा फॉरेन्सिक अहवालही पोलिसांना दिल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!