अकोला – अकोला पोलिस दलातील (Akola Police Force) तब्बल ५०० पोलिस अंमलदारासह एकूण ३० पोलिस उपनिरीक्षकांचीही (Sub-Inspector of Police) पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील सण, उत्सव व लोकप्रतिनिधी यांचे राजकीय दौऱ्यामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त सातत्याने बाहेरील जिल्ह्यातून मागविण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला पोलिस दलाद्वारे शासनाच्या गृहविभागाकडे (Home Department) पाठपुरावा करण्यात येत आहे.
नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
अकोला शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १३ हजार ९०० आहे. त्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ९ लाख ३२ हजार ३३४ असून, महिलांची लोकसंख्या ८ लाख ८१ हजार ५७२ इतकी आहे. त्यातुलनेत अकोला पोलिस दलात पाहिजे त्या प्रमाणात पोलिस कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे त्यांचा प्रचंड ताण यंत्रणेवर येत आहे. अशातच सण, उत्सव कालावधीत त्यात पालखी कावड बंदोबस्त गणपती विसर्जन सोहळा, पोळा, नवदुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी हे महत्त्वपूर्ण सण एकापाठोपाठ येत असल्याने त्यामुळे पोलिस दलाची दमछाक होत आहे. तर लोकप्रतिनिधी यांचे ‘व्हीआयपी’ दौरे, सभा आदी विषयांमुळे त्याचाही ताण साहजिकच पोलिसांवर येत असतो. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांची संख्या नसल्याने अकोला पोलिस दलातील पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदारांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच, शाहू महाराज की संभाजीराजे?
त्यानुषंगाने शासनाच्या गृहविभागाने अकोला पोलिस दलातील तब्बल ५०० पोलिस अंमलदार आणि ३० पोलिस उपनिरीक्षक असलेली रिक्त पदे निकाली काढण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
५०० पोलिस कर्मचारीपदांचा समावेश !
अकोला पोलिस दलातील तब्बल ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सण, उत्सवाच्या अनुषंगाने पोलिस खात्यावर प्रचंड ताण येत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यानुषंगाने अकोला पोलिस दलाचा शासनाच्या गृहविभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.