Just another WordPress site

युतीधर्माचे पालन इमानेइतबारे करा, पोटे पाटलांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, बालकमंत्री म्हणणाऱ्यांचेही टोचले कान!

अमरावती : कुठे आणि काय बोलावे, राजकारणात याहून अधिक महत्त्व कुठे शांत राहावे, याला असते. म्हणून की काय, पालकमंत्रीऐवजी बालकमंत्री म्हणणाऱ्या युतीतील एका घटक पक्षाच्या नेत्याचे भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील (Praveen Pote Patil) यांनी नुसते कानच टोचले नाही तर युतीधर्माचे पालन निवडणुकीपुरतेच करू नका, असा सल्लाही दिला. (Amravati Politics)

७५ हजार पदभरतीची घोषणा, नगर परिषदांमध्ये केवळ ४० टक्केच पदभरती; कॉंग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर आरोप 

महायुतीचा पदाधिकारी मेळावा () रविवारी अमरावतीत पार पडला. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सह इतर घटक पक्षांनी विरोधकांच्या विरोधात वज्रमूठ बांधावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. अनिल बोंडे, आ. रवी राणा, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, जयंत डेहनकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके, सुरेखा ठाकरे, शिंदे शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात ‘अब की बार, चार सौ पार’ झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताना त्यासाठी युतीधर्माचे पालन इमानेइतबारे होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. आपण पालकमंत्री असताना काही आपल्याला बालकमंत्री म्हणत अपमान करायचे. ती बाब अद्याप विसरलेलो नाही. त्यामुळे युतीतील भाजपसह प्रत्येक घटक पक्षातील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकाला सन्मानाची वागणूक देणे गरजेचे असल्याचे पोटे पाटील म्हणाले.

टिश्यू पेपरसारखा वापर करू नका
ज्याला कुणाला भाजप उमेदवारी बहाल करेल त्याच्यासोबत भाजपचा कार्यकर्ता उभा राहील. मात्र त्याचा टिश्यू पेपरसारखा वापर होत असेल तर परिणाम चुकीचे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आमदार पोटे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!