Just another WordPress site

Changes From 1 Sapmtember: १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडर आणि बँकिंग क्षेत्रासंबंधित ‘हे’ नियम बदलणार, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

ऑगस्ट महिना संपत आला. १ तारखेपासून नवा महिना सुरु होणार आहे. दर महिन्याला नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो.  १ सप्टेंबरपासून  देशात अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर काही बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. त्यामुळं सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळं तुम्हाला कोणत्या बदलांचा सामना करावा लागू शकतो, याबाबत आधीच माहिती असलेली बरी.जाणून घेऊयात १ तारखेपासून कोणते नवे बदल होणार आहेत? 



महत्वाच्या बाबी 

१. १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार

२. घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता!

३. इंधन दरवाढीत दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

४. पीएनबीच्या ग्राहकांना केवायसी करणे आवश्यक 


टोल दरात वाढ

यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने टोलमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली.  कारसारख्या छोट्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 10 पैसे अधिक कर्ज द्यावे लागेल. त्याचबरोबर मोठ्या व्यावसायिक वाहनांवर प्रति किलोमीटर ५२ पैसे अधिक टोल भरावा लागणार आहे.


विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये कपात 

IRDAI च्या माहितीनुसार १ सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे.जनरल इंश्युरन्स नियमांमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमान्वये ग्राहकांना आता ३० ते ३५ टक्के एजंट कमिशनऐवजी केवळ २० टक्के एजंट कमिशन द्यायला लागणार आहे. यामुळे तुमचा प्रीमियम कमी होणार आहे. 


पीएनबीच्या ग्राहकांना केवायसी आवश्यक 

काही दिवसांपूर्वीच पीएनबीने ग्राहकांना सावध केले होते. बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करून ही माहिती दिली होती की आरबीआयच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्राहकासाठी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे.  ३१ ऑगस्ट२०२२ पर्यंत तुमच्या खात्यात KYC अपडेट करणे आवश्यक आहे. जर केवायसी अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या मूळ शाखेत जाऊन ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी अपडेट पूर्ण करावे लागेल. अन्यथा खाते बंद करण्यात येईल. 


पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. याअंतर्गत १ सप्टेंबरलाही सरकारी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढवू किंवा कमी करू शकतात. गेल्या महिन्यातही गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती, कदाचित या महिन्यात पुन्हा सर्वसामान्यांना महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका बसेल.

पेट्रोल डिझेलच्या दरात बदल 

महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्याही पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. अशा स्थितीत असे होऊ शकते की महिन्याच्या सुरुवातीला इंधनाचे दर वाढू शकतात किंवा त्यात कोणताही बदल होणार नाही.गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोलियम कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे इंधन दरवाढीत दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. 


सुटे दूध ७ रुपयांनी महागणार

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!