Just another WordPress site

नवऱ्यांनो! पत्नीची अन्य महिलेशी तुलना कराल तर खबरदार..; उच्च न्यायालय म्हणतं, महागात पडेल

पती-पत्नीचे नाते फार घट्ट आणि तितकेच नाजूक असते. या नात्यामध्ये प्रेमाला जेवढे महत्व आहे, तितकेच खट्याळपणालाही आहे. पण तुम्ही जर मर्यादा सोडून पत्नीवर टिप्पणी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पत्नीला वारंवार टोमणे मारणे, तिची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता क्रुरता असल्याचं केरळ हायकोर्टानं एका खटल्यात म्हटलं. 


महत्वाच्या बाबी 

१. पत्नीची अन्य महिलांशी तुलना करणं हा क्रूरपणा 

२. केरळच्या उच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी 

३. ‘पत्नीची अन्य महिलांशी तुलना करणं बंद करा’

४. सुंदर न दिसणं हे घटस्फोटासाठी योग्य कारण नाही – कोर्ट 


केरळच्या उच्च न्यायालयाने पत्नीवरील होणाऱ्या अत्याचारांवर महत्वाची टिप्पणी केली.  यामुळे नवरदेवांना आता पत्नीशी बोलताना सावध रहावे लागणार आहे. पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे हे मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.  केरळ न्यायालयात घटस्फोटाचे एक प्रकरण आले होते. केरळमध्ये एका पतीनं पत्नी इतर महिलांच्या तुलनेत सुंदर दिसत नसल्याचं कारण देत तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हायकोर्टात या केसची सुनावणी झाली. पिडित पत्नीनं पती सुंदर दिसण्याची अपेक्षा पूर्ण नसल्याचं वारंवार सांगत असून तो छळ करत असल्याचं आरोप केला होता. त्यानंतर या खटल्यात सुनावणी करताना कोर्टानं वैवाहिक संबंधावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.  या  याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि नंतर चांगलेच सुनावले आहे. त्यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोघांमधील वाद मिटविण्याचे प्रयत्न विफल ठरल्यानंतर पती उच्च न्यायालयात गेला होता. यावर महिलेकडून पती छळ करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, या  याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाचे न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सीएस सुधा यांच्या खंडपीठानं वारंवार पत्नीवर ओरडणं आणि तिची दुसऱ्या महिलांशी तुलना करणं ही क्रुरता असल्याचं सांगितलं. याशिवाय केवळ सुंदर न दिसणं हे घटस्फोटासाठी योग्य कारण नाही, त्यामुळं ज्या वैवाहिक संबंधामध्ये संबंध कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, तिथं घटस्फोट घेतला जाऊ नये, असं म्हणत खटल्यात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिला.  दरम्यान, न्यायालयाने महत्वपुर्ण निरिक्षण नोंदवतांना आपल्या पत्नीची तुलणा इतरांशी न करण्याबाबतचा सल्ला देखील दिला.  त्यामुळे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं, टोमणे मारणे बंद करायला हवं अन्यथा कायद्याने त्यांना ते महागात पडू शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!