Just another WordPress site

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेआज दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांची सर्वांनाच उत्सुकता होती. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभेचीही निवडणूक जाहीर होईल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कुठलंही भाष्य केलं नव्हतं.

दरम्यान, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेत १८२ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर निवडणूक होणार आहेत. ५० टक्के मतदान केंद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. ५१,७८२ मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी ९४८ मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ३.२४ लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!