Just another WordPress site

तिकीट न दिल्यानं नामदेव उसेंडींचा भाजपात प्रवेश, विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का!

Dr Namdeo Usendi Join BJP : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक नेते कॉंग्रेसची (Congress) साथ सोडत आहेत. दोन दिवसांपूर्वी उमरेडचे आमदार राजू पारवे (Raju Parwe) यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आचा विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गडचिरोतील एका बड्या काँग्रेस नेत्याने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी (Dr Namdeo Usendi) यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा देत भापजात प्रवेश केला. उसेंडी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर गडचिरोलीत नाराजीचे नाट्य सुरू झाले होतं. उमदेवारी न मिळाल्यानेच उसेंडी यांनी भाजपात प्रवेश केला. नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल, अशी आशा होती. गडचिरोलीतील स्थानिक उमेदवार म्हणून मी काँग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र स्थानिक आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाने षडयंत्र रचून बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली. काँग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही. त्यामुळेच मी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं उसेंडी म्हणाले. आपण कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही, असा दावा देखील उसंडी यांनी केला.

बावनकुळे काय म्हणाले?
कॉंग्रेसला एका मागे एक धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी क्रॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद देवरा आणि आता उसेंडी यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. हाच धागा पकडून बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत आणि येत राहतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे कॉंग्रेस नेते पक्ष सोडत आहेत. पटोले यांनी अशोक चव्हाण, राजू पारवे, डॉ. उसेंडी यांचा आदर केला असता तर त्यांनी काँग्रेस सोडली नसती, असा चिमटा त्यांनी काढला. उसेंडी यांना भाजपमध्ये पूर्ण सन्मान मिळेल. राहुल गांधी नेहमीच ओबीसी आणि आदिवासी समाजाचा अपमान करतात. ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असं बावनकुळे म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!