Just another WordPress site

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदींनी भेट, महागाई भत्यात वाढ, महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : महागाई भत्त्यासंदर्भातील निर्णयाची वाट पाहणाऱ्या लाखो सरकारी कर्चमाऱ्यांची प्रतिक्षा आज संपली. नवरात्रोत्सवादरम्यान सामान्यपणे महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र हा भत्ता मिळण्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांवी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ३४ ऐवजी ३८ टक्के भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे १.१६ लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांपासून म्हणजे १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत डीए दिलेला नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो गेल्या डझनभर तिमाहींमधील सर्वाधिक आहे. यापूर्वी सरासरी डीएमध्ये केवळ ३ टक्के वाढ करण्यात आली होती, मात्र यावेळी महागाईचा फटका पाहता सरकारने तिजोरी उघडली आहे. आता ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शनधारकांना ३८ टक्के डीए (महागाई भत्ता) मिळणार आहे. डीएची वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. अशा प्रकारे महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ३४ टक्के करण्यात आला आहे. डीए वाढल्यानंतर कामगारांचे पगार ६८४० ते २७,३१२ रुपयांपर्यंत वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत दिली जाते. सरकारने या वर्षी मार्चमध्ये डीएमध्ये सुधारणा केली होती, जी नंतर कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या ३ टक्क्यांनी वाढून ३४ टक्के झाली. जर डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्याने डीए सध्याच्या ३४ टक्क्यांवरून आता ३८ टक्के झाला आहे. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर ३४ टक्के डीए मिळत होता.

एकाचवेळी ११ टक्के वाढला महागाई भत्ता

गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकरकमी ११ टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर प्रभावी महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून थेट २८ टक्के करण्यात आला. करोनाच्या काळात सरकारने तीन महिन्यांसाठी महागाई भत्ता रोखून ठेवला होता, जो गेल्या वर्षी जुलैमध्ये जारी करण्यात आला होता. सरकारने जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ साठीचा महागाई भत्ता राखून ठेवला होता.

पगार किती वाढणार?

४ टक्के डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होते. उदाहरणार्थ, जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल, तर ३४ टक्क्यांनुसार त्याला ६,१२० रुपये डीए मिळेल. पण आता ४ टक्के वाढीसह डीए ३८ टक्के झाल्यावर कर्मचार्‍यांना ६,८४० रुपये मिळतील. म्हणजेच त्याला ७२० रुपये अधिक मिळतील.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!