Just another WordPress site

मंगळयानाचा संपर्क तुटला; ८ वर्षांनंतर मोहीम संपुष्टात! भारताला काय होणार नुकसान?

ऐतिहासिक ठरलेल्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता झाली. भारताची मंगळयान मोहीम ८ वर्षे आणि ८ दिवसांनंतर संपुष्टात आली. भारताने केवळ ६  महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून यान पाठवलेले असताना तब्बल १६ पट कालावधीपर्यंत ते संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले होते. मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपल्याने ही मोहीम संपली.

 

महत्वाच्या बाबी 

१. मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपली
२. भारतानं मंगळयान २०१३ ला लाँच केलं
३. मंगळयान मिशनसाठी ४५० कोटींचा खर्च
४. मंगळयान तब्बल ८ वर्षे राहिलं कार्यरत

 

भारतानं मंगळयान हे ५ नोव्हेंबर २०१३ ला लाँच केलं होतं. ते २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं. त्या मिशनद्वारे भारत जगातील पहिला देश बनला होता जो थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला होता. आठ वर्षाच्या काळात मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीपर्यंत पोहोचवले. यामुळे शास्त्रज्ञांना संशोधनात मोठा फायदा झाला. मंगळयान मिशनसाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च आला होता. हाती आलेल्या माहितीनुसार,  मंगळयानातील इंधन संपल्यानं  मंगळयानासोबतचा संपर्क तुटल्याचं सांगितल्या जातं. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळयान त्याच्या नियोजित वेळेपेक्षा १६ पटीनं चाललं. मंगळयान मोहीम फक्त सहा महिन्यांसाठी चालवण्यात येणार होती, मात्र मंगळयानानं आठ वर्ष काम केलं. मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि डेटाही पोहोचवला ज्यामुळे अंतराळातील जगाविषयी आणि मंगळाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मंगळयानाने केलेलं हे काम केलं आहे जे आजपर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळयानाने केलेलं नाही. मंगळग्रहाची भौगौलिक, वायुमंडळातील प्रक्रिया, भूपृष्टावरील तापमान याची माहिती गोळा करणं हे काम मंगळयानाचं होतं.

मंगळयानाने कधी मंगळाच्या सर्वात दूरच्या बाजूला जाऊन फोटो काढले. तर कधी अगदी जवळ जाऊन फोटो काढले. मंगळयान मंगळाच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सर्वात दूर प्रदक्षिणा घालत असताना मंगळाच्या चंद्र डीमोसचे छायाचित्र पहिल्यांदाच घेण्यात आले. याआधी देशात कोणीही डेमोचे चित्र पाहिले नव्हते. मंगळयान योग्य वेळी आणि एकाच वेळी मंगळावर आल्याने जगभरात इस्रोचा रुबाब वाढला. त्याला वेगवेगळ्या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या अधिक ऑर्डर मिळू लागल्या. इस्रोला अनेक अंतराळ वाणिज्य, सेवा आणि उपग्रह प्रतिमांसाठी सौदे मिळाले. मंगळयानाने सौर ऊर्जेशी संबंधित सौर गतिशीलतेचा अभ्यास केला. मंगळयानच्या MENCA उपकरणाने सांगितले की मंगळाच्या पृष्ठभागाच्या२७०  किमी वर किती प्रमाणात ऑक्सिजन आणि CO2 आहे.
मात्र, आता मंगळयानाचा संपर्क तुटल्याने,  मंगळ ग्रहाशी संबंधित डेटासाठी भारताला अमेरिका, युरोप किंवा इतर देशांवर अवलंबून राहावे लागेल. जोपर्यंत नवीन मंगळयान म्हणजेच मंगळयान-२ जात नाही तोपर्यंत मंगळावरून कोणतीही बातमी मिळणार नाही. याशिवाय, कोणताही नवीन नकाशा बनवला जाणार नाही. तसेच कोणतेही नवीन संशोधन केले जाणार नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!