Just another WordPress site

ज्याला पाडायचे त्याला पाडा मनोज जरांगे यांचे आवाहन; कोणालाही पाठिंबा नाही

Manoj Jarange Patil On Loksabha Election : गावागावांतून आलेल्या अहवालांनुसार लोकसभा निवडणुकीत ( Loksabha Election 2024) अपक्ष उमेदवार देता येणार नाहीत. राजकारण डोक्यातून काढावे लागेल. या निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा, असे आवाहन करून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून देऊ, असा निर्णय मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी शनिवारी जाहीर केला.

नवनीत राणांना २०१४ मध्ये शरद पवार वडील वाटायचे, आता अमित शाह पितृतुल्य 

आगामी निवडणुकीबाबत मनोज जरांगे कोणती भूमिका घेतात, याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. त्यांनी शनिवारी दिवसभर विविध गावांमधून निवडणुकीबाबत आलेल्या अहवालांचे वाचन केले आणि सायंकाळी अंतरवाली सराटीत भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना राजकारण डोक्यातून काढावे लागेल. आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सहा महिन्यांचा वेळ आहे. त्यावेळी ताकद दाखवून देऊ.

जरांगे म्हणाले…
• आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा
• मी कुणाला मत द्या, ते सांगणार नाही
• प्रचाराला जायचे नाही, झेंडे लावायचे नाहीत
• राजकारणात परिपक्वता लागते

राजकारणात परिपक्वता लागते. त्यासाठी जाती एक करता आल्या पाहिजेत. काही जाती फोडाव्या लागतात, राजकारण इतके सोपे नाही. आपण एकाही राजकीय सभेला जाणार नाही. आपल्याला जो आपल्या बाजूने आहे असे वाटेल त्याला निवडून द्या. जो विरोधात आहे त्याला आडवे करा, असे आवाहनही त्यांनी केले. आया- बहिणींच्या अंगावर वळ उमटले ते विसरू नका. अनेकजण तुरुंगात गेले, अनेकांनी अपघातांत हात-पाय गमावले, उन्हातान्हात समाज रस्त्यावर आला, त्याची जाण असली पाहिजे. मतदान करताना ते विसरू नका. मराठ्यांची ताकद दाखवून द्या. मी कुणाला मत द्या, ते सांगणार नाही. मी कुण्याही जातीचा, पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. प्रचाराला जायचे नाही, झेंडे लावायचे नाहीत, नेते उघडे पडले पाहिजेत. जे करायचे ते ठरवून करू, असे ते म्हणाले.

नारायणगडावर सभा
आचारसंहिता संपल्यावर जूनमध्ये नारायणगडावर सभा घेऊ. तारीख नंतर जाहीर केली जाईल. नारायणगडावर साडेतीन हजार एकर जमीन उपलब्ध आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!