Just another WordPress site

मोदी सरकारने १० वर्षांत जनतेचे ३५ लाख कोटी लुटले; मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

नवी दिल्ली: मोदी सरकारने (Modi Govt) मागील १० वर्षे १०० दिवसांत पेट्रोल व डिझेलवर भरमसाट कर लावून जनतेचे तब्बल ३५ लाख कोटी रुपये लुटले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी सोमवारी केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊनही केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल चढ्या दराने विकत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणूकबहुल हरियाणा (Haryana Election) व जम्मू-काश्मीरची जनता भाजपला नाकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींबाबत विरोधकांना धास्तीच;  आमदार सतेज पाटील यांचा टोला  

निवडणूकबहुल राज्यांत भाजपचा पराभव होईल

काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे ट्विटरवरून म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत सध्या कच्चा तेलाचे भाव ३२.५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीही भाजप इंधनाच्या माध्यमातून लूट करीत आहे. विधानसभा निवडणूक होत असलेले हरियाणा व जम्मू-काश्मीर या राज्यात भाजपचा पराभव होईल. जनता मोदीपुरस्कृत महागाईला नक्कीच नाकारेल, असा दावा खरगे यांनी केला.

Ahmednagar News : बेशिस्त वाहतुकीमुळे तारकपूर रस्त्यावर कोंडी 

१६ मे २०१४ रोजी कच्चे तेल प्रति बॅरल १०७.४९ अमेरिकन डॉलर एवढे होते. तेव्हा दिल्लीत पेट्रोलचे दर ७१.५१ रुपये आणि डिझेल ५७.२८ रुपये प्रतिलीटर होते. तर, १६ सप्टेंबर २०२४ रोजी कच्चे तेल प्रति बॅरल ७२.४८ अमेरिकन डॉलर एवढे झाले. तर, दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये आणि डिझेल हे ८७.६२ रुपयांना विकले जात आहे.

सर्वसाधारणपणे विचार केला असता सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसार, पेट्रोल ४८.२७ रुपये तर डिझेल हे ६९ रुपये लीटर मिळायला पाहिजे परंतु, पेट्रोल व डिझेल महाग विकून मोदी सरकार जनतेला लुटत आहे. मागील १० वर्षे १०० दिवसांत मोदी सरकारने इंधनावर विक्रमी कर लावून जनतेचे ३५ लाख कोटी रुपये लुटले आहेत, याचे आश्चर्य वाटत नाही, असा आरोप खरगे यांनी केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!