Just another WordPress site

Langya Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स आणि आता लांग्या व्हायरसची धास्ती; आत्तापर्यंत चीनमध्ये ३५ जणांना लागण; हा व्हायरस आहे तरी काय?

देशात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखी एका नवीन विषाणूची एन्ट्री झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये लांग्या व्हायरस आढळून आला.  आतापर्यंत अनेकांना या नवीन विषाणूची लागण झाली. याच निमित्ताने हा व्हायरस आहे तरी काय? याची लक्षणं काय? याच विषयी जाणून घेऊ. 



महत्वाच्या बाबी 

१. कोरोनानंतर चीनमध्ये लांग्या व्हायरसची दहशत

२. काही दिवसात तीन डझन रुग्णांना झाले संक्रमण

३. जनावरांपासून पसरत जातो नवीन लांग्या व्हायरस 

४. ताप, खोकला, थकवा, भूख न लागणं ही लांग्याची लक्षणं 

लांग्या व्हायरस नेमका काय आहे?

खरं तर चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या व्हायरस आढळून आला. चीनी मीडिया तैपेई टाईम्सच्या मते, कोरोना व्हायरस जसा वटवाघुळापासून पसरला असं सांगितलं जातं, तशाच पद्धतीने जनावरापासून लांग्या पसरला आहे, अशी माहिती समोर येतेय. शास्त्रज्ञांनी २०० प्रजातींच्या प्राण्यांची चाचणी केली असून त्यांच्यात विषाणूजन्य आरएनए आढळून आले.  त्यामुळे त्यांच्यामधूनच या व्हायरसची उत्पत्ती झाली असल्याचा अंदाज आहे. < गार्डियनच्या वृत्तानुसार, दोन टक्के पाळीव शेळ्यांमध्ये आणि पाच टक्के कुत्र्यांमध्येही हा विषाणू आढळून आला.   या विषाणूंमुळे प्राणी आणि माणसांना गंभीर रोग होऊ शकतो. यामध्ये मृत्यू दर ४० ते ५० टक्के इतका आहे


कसा पसरतो लांग्या व्हायरस?

लांग्या व्हायरस पाळीव कुत्रे, बकरी आणि चुचुंद्री या प्राण्यांपासून पसरतो. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस गंभीर आहे. संक्रमित व्यक्तीची प्रकृती जर गंभीर झाली तर मृत्यू देखील होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, अजूनतरी एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.


काय आहेत लक्षणं?

चीनमध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, थकवा, भूख न लागणं, अंगदुखी, डोकेदुखी, उल्टी होणं अशी लक्षणं दिसून आली. बऱ्याच रूग्णांमधील पांढऱ्या पेशी, आणि प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत.तर काही रूग्णांचं लिव्हर आणि किडनी निकामी झालीय. 

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं काय?

तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी या व्हायरसचा संसर्ग माणसांमधून माणसांना होत नाही.मात्र, मात्र कोरोना आणि मंकीपॉक्सचा अनुभव लक्षात घेता नव्या व्हायरसपासून जगाला वाचवायचं असेल तर प्रत्येकानं सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.  दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लांग्या व्हायरसचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास याची गंभीर लक्षणंही दिसू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!