Just another WordPress site

वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती फडणवीसांची नवी चाल; अनिल देशमुखांची मोठा आरोप

Anil Deshmukh On Sachin Waze : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज (३ ऑगस्ट) मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. या आरोपानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

निवडणूक रोख्यांच्या एसआयटी चौकशीला नकार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या 

अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

Asha Worker : आशा सेविकांना मोबाइलसह ‘रिचार्ज’ही मोफत; फडणवीस यांची मोठी घोषणा 

पुढं बोलतांना देशमुख म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेंबद्दल हे स्पष्ट केलं होतं की, हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. आतापर्यंत दोन खूनाच्या गुन्ह्यात सचिन वाझेंना अटक करण्यात आली. आताही एका खूनाच्या गुन्ह्यात ते तुरुंगात आहे. सचिन वाझे हे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाहीत, असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मग अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरुन देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत. त्यामुळे मी जनतेला हे सांगू इच्छितो की मी जे आरोप फडणवीसांवर केले होते, त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!