Just another WordPress site

माजी कसोटीपटू आणि हॉकी ऑलिम्पियन ब्रायन बूथ यांचे निधन; ‘अशी’ गाजवली कारकीर्द

Former Australian Test player and Hockey Olympian Brian Booth passed away : आता बातमी आहे क्रिडाक्षेत्रातून. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि हॉकी ऑलिंपियन ब्रायन बूथ ((Brian Booth)  यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी ही माहिती दिली. बूथ यांनी ऑस्ट्रेलियासाठी २९ कसोटी सामने खेळले, त्यापैकी दोन कसोटी सामन्यात ते कर्णधारही होते. त्यांनी  आपल्या कसोटी कारकिर्दीत पाच शतके झळकावली. १९६० च्या सुरुवातीच्या काळात ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रमुख सदस्य होते.

त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४२.२१ च्या सरासरीने तब्बल १ हजार ७७३ धावा केल्या. याव्यतिरिक्त, बूथने मेलबर्न येथे  १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन हॉकी संघाचे प्रतिनिधित्व देखील केले होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बूथ या मधल्या फळीतील फलंदाजाने १९९२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते. यानंतर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पुढील कसोटी सामन्यातही त्यांनी शतक झळकावले.

न्यू साउथ वेल्सकडून खेळताना ब्रायन बूथने ११ शतकांसह ९३  देशांतर्गत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५ हजार ५५७ धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!