Just another WordPress site

ATM विसरला, काळजी नको, आता क्रेडिट- डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढता येईल कॅश, जाणून घ्या कसे?

सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्मार्टफोनवर एका क्लिकच्या मदतीने होतात. क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही कधी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि पण कार्डचं विसरलात तर मोठी पंचाईत होते. पण आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजीटल युगात हे शक्य झालं आहे. त्यामुळं तुम्हाला पैशांची गरज आहे आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणायला विसरला असाल तर अजिबात काळजी करू नका. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तुमची गरज सहजपणे पूर्ण करेल. जर तुम्हाला हार्ड कॅशची गरज असेल, तर तुम्ही UPI ची मदत घेऊ शकता आणि ATM मधून पैसे काढू शकता. या फिचरला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) असे म्हणतात. या फिचरमुळे आपल्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसतानाही एटीएममधून पैसे काढता येतात.

 

महत्वाच्या बाबी

१. क्रेडिट आणि डेबिट कार्डची गरज नाही
२. कार्ड शिवाय एटीएममधून पैसे काढता येतील
३. पैसे काढण्यासाठी युजर्सना हवा फक्त फोन

 

UPI ने पैसे काढण्याचे फायदे

१. GooglePay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI पेमेंट सेवा अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही एटीएममधून रोख पैसे काढू शकतात.
२. UPI च्या मदतीने, ATM मधून असे काढा पैसे:
३. सर्व प्रथम कोणत्याही ATM मशीनवर जा आणि नंतर स्क्रीनवर Withdraw cash हा पर्याय निवडा.
४. त्यानंतर UPI हा पर्याय निवडा.
५. यानंतर तुम्हाला ATM स्क्रीनवर एक क्यूआर (QR) कोड दिसेल.
६. यानंतर, तुमच्या फोनवर UPI अॅप सुरु करा आणि ATM मशीनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करा.
७. नंतर तुम्हाला हवी असलेली रक्कम इथे टाका. त्यातून तुम्ही फक्त 5,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.
८. त्यानंतर UPI PIN टाका आणि Proceed बटण दाबा.
९. यानंतर तुम्हाला ATM मशीनमधून पैसे मिळतील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की UPI द्वारे एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. पण, दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!